घरमहाराष्ट्रनाशिकशेतकरी नेते नानासाहेब मोरे अनंतात विलीन; शेतकर्‍यांचा राजा हरपल्याची भावना

शेतकरी नेते नानासाहेब मोरे अनंतात विलीन; शेतकर्‍यांचा राजा हरपल्याची भावना

Subscribe

पिंपळगाव बसवंत : निफाडचे भूमिपुत्र, शेतकर्‍यांचे कैवारी, शेतकर्‍यांचा मसिहा माधवराव उर्फ नानासाहेब खंडेराव मोरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ही वार्ता गावात पसरतात गावातील सर्व लहान-मोठ्या दुकानदारांनी दुकाने बंद करून नानासाहेबांच्या निधनाचा शोक व्यक्त केला. त्यांच्या स्वत:च्या जागेत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नानासाहेबांचे चिरंजीव विश्वासराव माधवराव मोरे यांनी व त्यांच्या दोन मुलींनी अग्निसंस्कार केले. यावेळेस केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी माधवराव मोरे यांच्याबद्दल बोलताना स्पष्ट केले की, शेतकर्‍यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी कांदा आंदोलन असो किंवा टोमॅटोची रासायनिक पद्धतीने लागवड असो असे अनेक प्रकारचे प्रयोग करून शेतकर्‍यांना शेती कशी करावी हे दाखवून दिले. त्याचप्रमाणे जसा शेतकरी महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे महिलासुद्धा महत्त्वाच्या आहेत. शेतकर्‍यांमध्ये धाडसी वृत्ती निर्माण करणारा शेतकर्‍यांचा राजा हरपला असेही त्या म्हणाल्या. यावेळी माधवराव मोरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही शोक संदेश आल्याचे त्यांनी शेवटी जाहीर केले.

शेतकर्‍यांचा भीष्माचार्य हरपल्याचे रामचंद्रबापू पाटील यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले की शेतकर्‍यांचा उतारा कर्जमुक्त झाला पाहिजे अशी मागणी माधवराव मोरे यांनीच केली होती. यावेळी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा शोक संदेश वाचून दाखवण्यात आला. शेतकर्‍यांच्या प्रश्नाला वाचा फोडणारे तसेच भांडवलशाही झुगारणारा शेतकर्‍यांचा नेता अनंतात विलीन झाल्याचे आमदार सुधीर तांबे म्हणाले. शेतकर्‍यांचा योद्धा हरपला असला तरी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या विचाराची बांधिलकी शासन दरबारी पाठपुरावा करून शेतकर्‍यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे ध्येय ठेवणार असल्याचे आमदार दिलीप बनकर म्हणाले. यावेळी मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस नितीन ठाकरे यांनी असे सांगितले की, नानासाहेब यांनी शेतकर्‍यांसाठी जो आदर्श निर्माण केला त्या आदर्शाचे सर्व शेतकरी वर्गाने पालन करावे म्हणजे त्यांना हीच खरी आदरांजली ठरेल.

- Advertisement -

यावेळी माजी शिक्षक आमदार नानासाहेब बोरस्ते, जिल्हा बँक संचालक राजेंद्र डोखळे, श्रीराम पंचायत समिती सदस्य इंद्रपाल थोरात, माजी सरपंच भास्करराव बनकर यांनीही नानासाहेबांना आपल्या छोटेखानी भाषणात श्रद्धांजली अर्पण केली. याप्रसंगी नानासाहेब मोरे यांचे पिंपळगाव बसवंत येथे भव्य स्मारक व्हावे या विषयावर शेतकरी संघटनेचे वडघुळे, दीपक पगार, ललित बहाळे, प्रणव पवार यांनी आपले मत व्यक्त केले व त्यासाठी लागणारी मदत सर्व स्तरातून केली जाईल असे सांगण्यात आले.

माधवराव उर्फ नानासाहेब मोरे यांच्या पार्थिवावर मंत्री डॉ. भारती पवार, आमदार सुधीर तांबे, आमदार दिलीप बनकर, प्रांत अर्चना पठारे, बँक ऑफ महाराष्ट्रचे मुख्य अधिकारी व त्यांचे कर्मचारी त्याचप्रमाणे विविध कार्यकारी सोसायट्यांचे चेअरमन विनायक खोडे, सोमनाथ मोरे, सोनलाल भंडारी, विजय बाफना, प्रणव पवार यांनी पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी नानासाहेब महाले, बाळासाहेब बनकर, विश्वासराव मोरे, पिंपळगाव पोलीस ठाण्याचे पीआय प्रभाकर निकम व त्यांचे कर्मचारी, सयाजीराव गायकवाड, संदीप जगताप, बाळासाहेब बनकर, सुरेशबाबा पाटील, बाळासाहेब क्षिरसागर, रंजीत पाटील, सुभाष गवळी, अर्जुनतात्या बोराडे, अशोक भंडारी, देविदास पवार, तानाजी बनकर, दिलीप मोरे, चंद्रकांत खोडे तसेच पिंपळगाव परसरातील नागरिक मोठ्या संख्येने अंत्ययात्रेत सहभागी झाली होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -