घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक जिल्हा परीषदेत डिसेंबर पासुन बायोमॅट्रिक हजेरी प्रणाली

नाशिक जिल्हा परीषदेत डिसेंबर पासुन बायोमॅट्रिक हजेरी प्रणाली

Subscribe

जिल्हा परिषद कर्मचारयांना बायोमॅ्ट्रिक हजेरी बंधनकारक असेल

नाशिक :विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी बायोमॅट्रिक हजेरी प्रणाली कार्यान्वित करण्याचे आदेश दिल्याने जिल्हा परिषद कर्मचारयांना बायोमॅ्ट्रिक हजेरी बंधनकारक असेल.खाजगी कंपनीकडुन ही यंत्रणा बसवून घेतली जाणार आहे. येत्या १ डिसेंबर पासुन मुख्यालयात याची अंमलबजावनी होत आहे.

जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी सर्व विभागांना अचानक भेट देत हजेरी पत्रक व हालचाल पत्रकाची तपासनी केली.त्यात जिल्हा परीषदेतील सुमारे ३५० कर्मचारयांर्पैकी ५० हुन अधिक कर्मचारी कार्यालयीन वेळेत ऊपस्थित नसल्याचे निदर्शनास आले. त्या लेटलतिफांना नोटीस बजावण्यात आली.ऊशिराने येणारया कर्मचारयांविषयिच्या तक्रारी लक्षात घेत विभागीय आयुक्तालय कार्यालयात जळगाव जिल्हा परीषदेच्या धर्तीवर बायोमॅट्रिक हजेरी बसवण्यात आली.

- Advertisement -

विभागीय कार्यालयात, विभागातील सर्व जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमध्ये बायोमेट्रिक हजेरी बसवण्याचे आदेश दिले. या आदेशाची अंमलबजावणी करायला प्रशासनाने सुरूवात केली; मात्र, जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आली. त्यामुळे ही प्रक्रिया रखडली असताना कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. शासकीय कार्यालय पूर्ववत सुरू झाले आहेत. कार्यालये सुरू झाल्यानंतरही अनेक कर्मचारी कार्यालयीन वेळेत येत नसल्याचे दिसत आहे. तर, अनेक कर्मचारी कार्यालयीन वेळात वैयक्तीक कामांसाठी बाहेर जात असल्याच्या तक्रारी होत्या. कामाच्या वेळात कर्मचारी वेळ वाया घालवत असल्याचे प्रकारही अनेकदा दिसले.
पाच दिवसांचा आठवडा केला असून कार्यालयीन वेळेतदेखील बदल केला आहे. शासकीय कार्यालयांची वेळ सकाळी 9.45 ते संध्याकाळी 6.15 पर्यंत केली खरी. मात्र, तत्पूर्वीच कर्मचारी गायब होत असल्याचे प्रकारही अनेकदा घडले. त्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

बायोमेट्रीक हजेरी 1 डिसेंबरपासून कार्यान्वित करण्याचा विचार आहे. त्यादृष्टीने खासगी कंपनीच्या मार्फत ही यंत्रणा बसवण्यात येईल.
– आनंद पिंगळे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन जि.प.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -