घरताज्या घडामोडीप्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी घोषित, सोनिया गांधींकडून नावावर शिक्कामोर्तब

प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी घोषित, सोनिया गांधींकडून नावावर शिक्कामोर्तब

Subscribe

काँग्रेस राज्यसभा खासदार दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना कँग्रेसकडून विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसमध्ये प्रज्ञा सातव यांचे नाव निश्चित झाले असून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शिक्कामोर्तब केला आहे. राजीव सातव यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव काही महिन्यांमध्येच राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. हिंगोलीमध्ये आमदार शरद रणपिसे यांच्या निधनामुळे विधानपरिषदेची एक जागा रिक्त झाली आहे. याच जागेवर प्रज्ञा सातव यांना सधी देण्यात आली आहे. प्रज्ञा सातव यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु होती अखेर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.

खासदार राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. राजीव सातव यांच्या जागी रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देणं अपेक्षित होते मात्र त्यांचा अनुभव पाहता त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले नाही. विधानपरिषदेचे आमदार शरद रणपिसेंच निधन झाल्यामुळे एक जागा रिक्त झाली आहे. या जागेवर प्रज्ञा सातव यांना सधी देण्यात आली आहे. दिल्लीतील नेत्यांनी प्रज्ञा सातव यांच्या नावाला पसंती दिली असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

प्रज्ञा सातव यांनी विधानपरिषदेवरील संधी निश्चित मानली जात होती. या जागेसाठी चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, जितेंद्र देहाडे या नेत्यांचीही नावे चर्चेत होती. पंरतु दिवंगत खासदार राजीव सातव यांचे दिल्लीमध्ये वजन होते. सातव यांचे गांधी कुटुंबीयांशी चांगले संबंध होते. त्यामुळे प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेवर संधी मिळण्याची दाट शक्यता होती.

प्रज्ञा सातव आपले मुळ गाव हिंगोली-कळमनुरीतून राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. कोरोना काळात खासदार राजीव सातव यांचा मृत्या झाला. काही महिन्यानंतर प्रज्ञा सातव दिल्लीत काँग्रेस नेतृत्वाची आणि राज्यातील काँग्रेस नेत्यांची भेट घेतल्या आणि राजकारणात सक्रिया झाल्या. पक्षाच्या सर्व कार्यक्रमात प्रज्ञा सातव सहभागी होताना दिसतात.

- Advertisement -

हेही वाचा : लोकांनी बाबासाहेब पुरंदरेंच्या कामातही उणिवा काढल्या, पण… पवार म्हणाले…


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -