घरमहाराष्ट्रनाशिकव्यापार्‍याला लुटणारी टोळी गजाआड

व्यापार्‍याला लुटणारी टोळी गजाआड

Subscribe

शहराच्या मध्यवर्ती आणि वर्दळीच्या भागात एअर गनद्वारे फायरिंग करत एका व्यापार्‍याकडील साडेतीन लाख रुपये लुटणार्‍या टोळीतील सहाजणांना शहर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे.

शहराच्या मध्यवर्ती आणि वर्दळीच्या भागात एअर गनद्वारे फायरिंग करत एका व्यापार्‍याकडील साडेतीन लाख रुपये लुटणार्‍या टोळीतील सहाजणांना शहर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी ३६ हजार ५०० रूपयांची रोकड जप्त केली आहे.

योगेश घनश्याम बस्ते (२६, रा.राणेनगर, इंदिरानगर,नाशिक), विजय देविदास धनगर (२१, कामठवाडा, नाशिक), प्रवीण प्रकाश किरवे (२५, रा.सावरकरनगर, जेलरोड, नाशिक, मूळ रा.सांगवी, ता.अकोला, जि. अहमदनगर), तुषार भास्कर मगर (२०, रा.उपेंद्रनगर, अंबड, नाशिक, मूळ रा.औरंगाबाद), हरिष व्यंकट पटेल (२९, उपेंद्रनगर, अंबड,नाशिक), निलेश पोपट शिंगाडे (२९, रा.वडारवाडी, सम्राटनगर, पंचवटी,नाशिक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

- Advertisement -

शरणपूर रोडवरील राका कॉलनी भागात असलेल्या गजानन स्मृती अपार्टमेंटमध्ये राहणारे विराग शाह हे गोळे कॉलनीमधील आपल्या वैद्यकीय साहित्य विक्रीचे दुकान बंद करुन घरी परतले. त्यांच्या मागोमाग पाठलाग करत तिघे मोटरसायकलस्वारही आले. या तिघांपैकी एकाने शाह यांच्या दिशेने गोळीबार करत दहशत निर्माण केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या शाह यांनी जिन्याकडे धाव घेतली. मात्र, याच वेळी त्यांच्या हातातील साडेतीन लाख रुपये असलेली बॅग दुचाकीवरील दोघांनी हिसकावून ताब्यात घेतली. त्यानंतर तिघेही मोटरसायकलवरुन सुसाट वेगात फरार झाले. ही घटना शनिवारी (३० मार्च) रात्री 8 वाजेच्या सुमारस साधुवासवानी रोड, कुलकर्णी कॉलनीमधील गजानन स्मृती येथे घडली. पोलिसांनी शहरात नाकाबंदी करत लुटारूंचा शोध सुरू केला. गुन्हे शाखा युनीट क्र.२ चे पोलीस नाईक परमेश्वर दराडे यांना टोळीतील सहाजण शहरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सहाजणांना शिताफीने अटक केली. त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी सहा मोबाईल, एअर पिस्टल, चार दुचाकी व ३६ हजार ५०० रूपयांची रोकड जप्त केली.

ही कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, पोर्णिमा चौगुले, आर.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिनेश बर्डेकर, रविंद्र सहारे, महेश इंगोले, विजय लोंढे, रूपाली खांडवी, श्रीराम सपकाळ, राजाराम वाघ, देवकिसन गायकर, संतोष ठाकूर यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -