घरमहाराष्ट्रनाशिककोरोना योद्ध्यांप्रति कृतज्ञता

कोरोना योद्ध्यांप्रति कृतज्ञता

Subscribe

परिचारिका रेखा देवरे यांचे देवळ्यात पुष्पवृष्टी करत स्वागत

कोरोना विषाणूच्या संक्रमीत रुग्णांना सेवा देण्यासाठी गेलेल्या देवळा ग्रामीण रुग्णालयाच्या कोविड १९ योद्धा परिचारिका रेखा देवरे या मालेगाव येथील कोविड कक्षात सेवा बजावून देवळा परतल्यानंतर त्यांचे अभूतपूर्व उत्साहात स्वागत करण्यात आले.

मालेगाव हे करोनाचा हॉटस्पॉट ठरले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर व त्यांना सांभाळणाऱ्या परिचरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाच्या विषाणूचे संक्रमण आढळून आहे. त्यामुळे रोजच वाढत जाणाऱ्या रुग्णांवर उपचार व देखभाल करण्यासाठी अतिरिक्त आरोग्य कर्मचाऱ्यांची गरज निर्माण झाली आहे. यासाठी देवळा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाच्या परिचारिका रेखा देवरे ह्या रविवार दि. १० पासून तर शनिवार दि. १६ पर्यंत मालेगाव येथील कोविड कक्षात सात दिवसांची सेवा देऊन नुकत्याच देवळा येथे परत आल्यात. यावेळी देवळा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश कांबळे, डॉ. गौरी निफाडकर, वैशाली गायकवाड, संगीता देशमुख, धनश्री देवरे, दीपिका खैरणार, बापू शिरसाठ, विशाल माळी, सचिन उघडे, शरद शिणकर, शरद मोरे, सतीश चव्हाण, ज्योती वाघ, सुभाष मगर इत्यादी कर्मचाऱ्यांनी त्यांचे पुष्पवृष्टी करून स्वागत केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -