घरमहाराष्ट्रनाशिककृतज्ञता, वेळेचे नियोजन अन् मानव संसाधन व्यवस्थापन त्रिसूत्री महत्वाची; किरण बेदी यांचे...

कृतज्ञता, वेळेचे नियोजन अन् मानव संसाधन व्यवस्थापन त्रिसूत्री महत्वाची; किरण बेदी यांचे प्रतिपादन

Subscribe

नाशिक : सामाजिक प्रगतीसाठी कृतज्ञता, वेळेचे नियोजन आणि मानव संसाधन व्यवस्थापन या त्रिसूत्रीचा सर्वांनी अवलंब करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी आय.पी.एस. अधिकारी किरण बेदी यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात विविध उपक्रमांतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शुक्रवारी (दि.९) सकाळी बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. किरण बेदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या कुलगुरू माधुरी कानिटकर होत्या.

यावेळी सायना भरुचा, प्रतिकुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी एन. व्ही. कळसकर, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मनोजकुमार मोरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी किरण बेदी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. बेदी पुढे म्हणाल्या की, श्रध्दा ठेवून काम केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम अनुभवास येतो. तरुणांनी विशेषतः विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे कष्ट करुन काम केल्यास त्याचा आनंद सुखावह असतो. विद्यार्थीदशेत असताना सर्वांनी कृतज्ञता, वेळेचे नियोजन व मानव संसाधनाचा योग्य पध्दतीने व्यवस्थापनाचा अवलंब करावा. जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही. त्यासाठी सकारात्मक प्रयत्न गरजेचे असतात. सामाजिक दायित्व व नैतिक जबाबदारीचे भान गरजेचे आहे. आरोग्य शिक्षणाबरोबर संशोधनाला मोठ्या प्रमाणात संधी आहेत. यासोबत पेटंट पद्धतीसाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील राहावे. समाजातील वावर, विविध विषयावरील पुस्तकांचे वाचन, क्रीडा यातून सकारात्मक विचारांची निर्मिती होते. विद्यापीठाने सांस्कृतिक, संशोधन व क्रीडा विषयक कार्यक्रमातून व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. शुध्द मनाने व विचारांनी सतत सकारात्मकतेने काम करत राहिल्यास नक्कीच यशाचे भागीदार होता येते, असा कानमंत्रही बेदी यांनी दिला.

- Advertisement -

कुलगुरू कानिटकर म्हणाल्या की, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व कौशल्य वाढीसाठी विद्यापीठाकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग व उत्साह वाखाणण्याजोगा आहे. आरोग्य शिक्षणाबरोबर सर्वांगिण विकासासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. स्पंदन-2023 मध्ये विद्यार्थ्यांनी केलेले सादरीकरण स्त्युत्य आहे. पारितोषिक विजेते सर्व विद्यार्थ्यांनी आणि विद्यापीठाचा नावलौकीक करावा. स्वप्निल तोरणे यांनी सूत्रसंचालन केले. विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मनोजकुमार मोरे यांनी आभार मानलेे.

विद्यार्थ्यांचा सन्मान

केंद्रिय लोकसेवा आयोग 2023 रोजीच्या परीक्षेत आरोग्य विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालातील राज्यातील टॉप विद्यार्थी, स्पंदन – 2023 मध्ये विविध कलाप्रकारात पुरस्कारार्थी विद्यार्थ्यांचे प्राचार्य, राष्ट्रीय सेवा योजनेचे उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी, स्वयंसेवक, राष्ट्रीय सेवा योजनेचे उत्कृष्ट एकक, अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रीडास्पर्धेत रौप्य व कांस्यपदक प्राप्त विद्यार्थी, प्रजासत्ताक दिनी मुंबई येथे पथसंचलनात सहभागी विद्यार्थी, राष्ट्रीय एकता शिबिरात सहभागी विद्यार्थी, उत्कर्ष या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग नोंदवून पारितोषिक प्राप्त विद्यार्थी, नॅशनल यूथ पार्लमेंट फेस्टिवल – 2023 साठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. आरोग्य विद्यापीठातर्फे रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त शाखानिहाय विशेष शिष्यवृत्ती पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्कारार्थींना विद्यापीठातर्फे बक्षीस रक्कम 25 हजार रुपये व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात येणार्‍या स्पंदन सांस्कृतिक महोत्सव, आविष्कार संशोधन महोत्सव, इंद्रधनुष्य राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सव व राष्ट्रीय स्तरावर क्रीडा प्रकारात यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -