घरमनोरंजनतो माझे अश्रू पुसतो... भावनिक कॅप्शन लिहितं इलियानाने शेअर केला बॉयफ्रेंडसोबतचा नवा...

तो माझे अश्रू पुसतो… भावनिक कॅप्शन लिहितं इलियानाने शेअर केला बॉयफ्रेंडसोबतचा नवा फोटो

Subscribe

अभिनेत्री इलियाना डिक्रूझ सध्या तिच्या प्रेग्नेंसीचा आनंद घेत आहे. इलियाना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या चाहत्यांना तिच्या आयुष्यातील नवनवीन अपडेट शेअर करत असते. नुकत्याच काही दिवसांपूर्वी इलियानाने बॉयफ्रेंडसोबतचा एक फोटो शेअर केला होता. ज्यात तिचा आणि तिच्या बॉयफ्रेंडचा हात दिसत होता. या फोटोमुळे इलियानाच्या बाळाचे बाबा नक्की कोण हे पाहण्यासाठी उत्सुक झाले होते. अशातच, तिने बॉयफ्रेंडसोबतचा आणखी एक फोटो शेअर केला होता.

इलियानाने शेअर केला बॉयफ्रेंडसोबतचा फोटो

नुकतंच इलियानाने तिच्या सोशल मीडियावरुन एक ब्लर फोटो शेअर केला आहे. ज्यात ती आणि तिचा बॉयफ्रेंड दिसत आहेत. मात्र, हा फोटो ब्लर असल्यामुळे दोघांचेही चेहरे स्पष्ट दिसत नाहीत. या फोटोसोबत इलियानाने खाली कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “प्रेग्नेंट होणं किती सुंदर वरदान आहे. मी कल्पना करू शकत नाही की हा क्षण अनुभवण्यासाठी मी कधी भाग्यवान असू शकले असते. तुमच्या आतल्या जीवनाला जन्म देण्याचा अनुभव किती आनंददायी आहे हे मी व्यक्त करू शकत नाही. माझे बेबी बंप पाहून मला आनंद होतो.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Ileana D’Cruz (@ileana_official)

- Advertisement -

पुढे इलियानाने लिहिलंय की, नंतर असेही काही दिवस असतात. जे खूप कठीण असतात. कोणत्याही गोष्टीचा रस्ता सापडत नाही आणि मग कधी रडायला येते. त्यानंतर अपराधीपणाची भावना निर्माण होते. मी हा आवाज ऐकतो, जो मला शांत करतो. जर मी बलवान नाही तर मी कशा प्रकारची आई होईल आणि मी मजबूत आहे की नाही हे मला माहित नाही. मला एवढेच माहित आहे की, माझ्या आत वाढणाऱ्या जीवनावर माझं प्रेम आहे. मला वाटतं आता पुरेसं आहे.”

इलियाने पुढे लिहिलंय की, “जेव्हा मी स्वतःसाठी कठोर होते. तेव्हा हा प्रेमळ माणूस मला हिंमत देतो. त्याने मला सांभाळले आहे. तुटल्यासारखं वाटत असतानाही याने मला एकत्र ठेवलं आहे. तो माझे अश्रू पुसतो आणि मूर्ख विनोद करून मला हसवतो किंवा फक्त मला मिठी मारतो जेव्हा त्याला माहित असते की, मला काय हवे आहे. मग काहीच अवघड वाटत नाही.” असं इलियाना म्हणाला.

- Advertisement -

दरम्यान, इलियाने शेअर केलेला हा फोटो आणि खालील कॅप्शन वाचून फोटोतील व्यक्ती इलियानाचा बॉयफ्रेंड असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, तो नक्की कोण आहे याकडे सर्वांच लक्ष लागून राहिले आहे.


हेही वाचा : 

जॅकी दादाची पत्नी आयशा श्रॉफ यांना 58 लाखांचा गंडा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -