घरमहाराष्ट्रनाशिकआदिवासी महिलांची रोजगाराची गुढी

आदिवासी महिलांची रोजगाराची गुढी

Subscribe

जनशिक्षण संस्थेतर्फे आज सिटी सेंटर मॉलमध्ये होणार विक्री

प्रज्ञा दिवटे , नाशिक : येत्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने जन शिक्षण संस्थान, नाशिक येथे यांच्यामार्फत इको-फ्रेंडली गुढ्या बनवण्याचा उपक्रम केला जात आहे. या गुढ्या आदिवासी समाजाच्या महिला बनवत आहेत.वाढत्या शहरीकरणामुळे अनेकदा जागेचा अडसर येतो आणि इच्छा असूनही गुढी उभारता येत नाही. नेमकी हीच अडचण लक्षात घेऊन मिनिएचर गुढीची संकल्पना पुढे आली. पारंपरिक गुढी ही तिच्या मोठ्या आकारामुळे घरात लावता येत नाही. त्यामुळेच या लहान आकाराच्या गुढ्यांना गेल्या काही वर्षांपासून मागणी वाढली आहे. विशेष म्हणजे कॉर्पोरेट कंपन्यांकडून आपल्या कर्मचार्‍यांना गुढीपाडव्यासाठी या गुढ्या गिफ्ट म्हणूनही दिल्या जातात.

वाढती मागणी लक्षात घेता संस्थेने यंदा इको फ्रेंडली गुढी बनवण्याचा अनोखा उपक्रम हाती घेतला. ही गुढी बांबू, खण आणि लहानसा तांब्याचा तांब्या या वस्तूंपासून बनवली जाते. त्यामुळे आदिवासींच्याही हाताला रोजगार मिळतो. ही गुढी विविध आकार आणि रंगांत उपलब्ध असून, त्यानुसार तिची किंमत आहे. या गुढ्या १५० ते ३०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. १ एप्रिलला गुढी पाडव्याच्या दिवशी शहरातील सिटी सेंटर मॉल येथे या आकर्षक गुढ्यांचे प्रदर्शन भरविले जाणार आहे. ग्राहकांनी या गुढ्या घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या संचालिका ज्योती लांडगे यांनी केले आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -