घरमहाराष्ट्रनाशिकएचएएल हेरगिरीप्रकरणी संशयिताला न्यायालयीन कोठडी

एचएएल हेरगिरीप्रकरणी संशयिताला न्यायालयीन कोठडी

Subscribe

प्रतिबंधित क्षेत्रांची गोपनीय माहिती पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तहेर संघटनेला दिल्याचा आरोप

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) या कंपनीतील विमान कारखान्यासह परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रांची गोपनीय माहिती पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तहेर संघटनेला देणार्‍या कर्मचारी दीपक शिरसाठ याला सोमवारी (दि.१९) न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने त्याला अटक केली असून त्याच्या ताब्यातून ३ मोबाईल, ५ सीमकार्ड, २ मेमरी कार्ड जप्त केले आहेत.

दीपक शिरसाठ याने भारतीय बनावटीच्या विमानांची, विमानांच्या संवेदनशील तांत्रिक तपशील, एचएएल कारखान्यासह परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रांची गोपनीय माहिती आयएसआयला पुरवित असल्याचेही पुढे आले. पथकाने तातडीने कारवाई करत त्याला अटक केली. हनी ट्रॅपव्दारे लंडन येथून अनोळखी युवतीने शिरसाठशी ओळख वाढवत गोपनीय माहिती मिळवल्याचे पुढे आले आहे. त्याचाकडून जप्त केलेले ३ मोबाईल, ५ सीमकार्ड, २ मेमरी कार्ड विश्लेषणासाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आले आहेत. पथकाने त्याला १० ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. कोठडी संपल्याने पथकाने सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायलयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -