घरमहाराष्ट्रम्हणून मिळतोय ब्लॅक अँड व्हाईट टीव्हींना लाखो रुपयांचा भाव

म्हणून मिळतोय ब्लॅक अँड व्हाईट टीव्हींना लाखो रुपयांचा भाव

Subscribe

अफवेमुळे खेडोपाडी जोरदार शोधमोहीम, भंगाराच्या दुकानांसह रिपेअरिंग सेंटर्सकडेही मागणी

जगदीश निकम, देवळा

ब्लॅक अँड व्हाईट टीव्हींमध्ये असलेली नळी लाखो रुपयांना विकली जात असल्याची जोरदार अफवा गेल्या काही दिवसांपासनं पसरलीय. त्यामुळे शहरांसह ग्रामीण भागातही ब्लॅक अँड व्हाईट अर्थात कृष्णधवल टीव्हींचा शोध सुरू झालाय. हे टीव्ही शोधण्यासाठी तरुण पिढीसोबत महिलादेखील आघाडीवर आहेत.

- Advertisement -

१९६० ते १९९० दरम्यान लाकडी शटर असलेले १७ इंचाचे टीव्हींचे मॉडेल्स मिळत असत. तंत्रज्ञान आजएवढं प्रगत नसल्यानं त्या काळात टीव्ही आणि रेडीओमध्ये एक लाल रंगाचं पार्‍यासारखं द्रावण असलेली छोटी नळी बसवली जात होती. त्यामुळेच त्यांचा आकारही मोठा असे. कालांतरानं कलर टीव्हीनं या ब्लॅक अँड व्हाईट टीव्हींची जागा घेतली आणि या टीव्हींचा वापर बंद झाला. साधारण ४० वर्षांनंतर पुन्हा एकदा एका अफवेमुळं हे टीव्ही पुन्हा चर्चेत आलेत.

साठच्या दशकात तयार होणार्‍या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये बसवली जाणारी ही लाल द्रावणाची नळी सध्या लाखो रुपयांना विकली जात असल्याची अफवा ग्रामीण भागात पसरली आहे. काही जण हा आकडा वाढवून कोटीही सांगत आहेत. त्यामुळे अशी नळी शोधण्याकामी लोक लागले आहेत. स्थानिक भाषेत रेड मर्क्युरी या नावानं ओळखली जाणारी ही नळी शोधण्यासाठी भंगार विक्रेते, टीव्ही विक्रेते यांच्याकडे विचारणा सुरू आहे. काही जण तर लाखो रुपये देऊन ती विकत घेण्याची तयारीही दर्शवत आहेत. वास्तविक दोन इंचाच्या सीलबंद असलेल्या या नळीची किंमत सर्वसामान्य आहे. मात्र, अफवेची शहानिशा न करता या नळीचा शोध घेण्याचं काम मात्र जोमाने सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -