घरमहाराष्ट्रनाशिककोविडच्या लाटेसाठी नाशिकचे आरोग्य प्रशासन सज्ज

कोविडच्या लाटेसाठी नाशिकचे आरोग्य प्रशासन सज्ज

Subscribe

शहरातील तयारीचा अहवाल आज केंद्राला करणार सादर

नाशिक : चीनमध्ये कोविडच्या नव्या व्हेरियंटच्या प्रार्दुभावाने धुमाकूळ माजलेला असताना केंद्र सरकारनेही सर्व राज्यांना सर्तकतेचे निर्देश दिले आहेत. कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने नाशिकमध्ये देखील प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारी आरोग्य विभागाचा आढावा घेत सज्जतेचे आदेश दिले आहेत. उद्या (दि. २७) रोजी जिल्हयातील कोविड तयारी संदर्भात केंद्राला माहीती सादर करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांनी सांगितले.

कोरोना प्रतिबंधासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. अर्थात सध्या घाबरण्यासारखी परिस्थिती नसली तरी, सर्तकता म्हणून केंद्र सरकारने राज्यांना ऑक्सिजन सिलिंडर, व्हेंटीलेटर, औषधे आणि इतर आवश्यक तयारी करून ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभुमीवर सोमवारी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी आरोग्य यंत्रणेची बैठक घेत स्थितीचा आढावा घेतला. यावेळी नाशिक शहरातीलही आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. कोरोना लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन सामान्य रूग्णालयाने तयारी पूर्ण केली आहे. मंगळवार (दि.२७) रोजी जिल्हयातील तयारी संदर्भात केंद्राच्या पोर्टलवर माहीती अपलोड केली जाणार आहे. जिल्हयातील ऑक्सिजन पुरवठा, ऑक्सिजन साठा, पीएसए प्लांट, जिल्हयात झालेले लसीकरण आदींबाबत केंद्राला माहीती देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. यापुर्वीच्या कोरोना महामारीच्या संकटात आरोग्य विभागांना ज्या अडचणींचा सामना करावा लागला होता त्या अडचणी दुर करण्याचा या मागचा उददेश असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

जिल्ह्यात घाबरण्याची स्थिती नाही त्यामुळे नागरीकांना घाबरून न जाता खबरदारी घ्यावी. गर्दीच्या ठिकाणी जातांना मास्क वापरावा, लसीकरण करून घ्यावे. केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या निर्देशानूसार मंगळवारी जिल्हयात मॉक ड्रील घेण्यात येणार आहे. संभाव्य धोक्याच्या पार्श्वभुमीवर आरोग्य यंत्रणेची तयारी याव्दारे तपासणी केली जाईल. – गंगाथरन डी., जिल्हाधिकारी

 

आरोग्य विभागाने संभाव्य धोका लक्षात घेत तयारी केली आहे. टेस्टिंगचे प्रमाण वाढविले आहे. संभाव्य आपत्तीला तोंड देण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज आहे.
– बापुसाहेब नागरगोजे, आरोग्य अधिकारी, महापालिका

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -