घरक्राइमअवैध गौण खनिज उत्खननप्रकरणी तलाठी निलंबित

अवैध गौण खनिज उत्खननप्रकरणी तलाठी निलंबित

Subscribe

क्रशरचालकांना दंडाची नोटीस

नाशिक :  नांदगाव येथील अवैध खडीक्रशर प्रकरणात मंडलाधिकार्‍यानंतर पिंपरखेडचे तलाठी जयेश मलदुडे यांना कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आले. मात्र, जागेवर ३ हजार ५७१ ब्रासची अवैधपणे उत्खनन करणार्‍या क्रशरचालकाला ३ कोटी ४२ लाखाची दंडात्मक नोटिस बजावल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली जात आहे.

नांदगावच्या गणेश नगर भागात आठवड्याभरापूर्वी मालेगावच्या अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे आणि जिल्हा गौणखनिज विभाग यांच्या संयुक्त पथकाने कारवाई करत अवैध क्रशर सील केले. तब्बल सहा महिन्यांपासून अवैधपणे चालविल्या जाणार्‍या या क्रशरवर थेट नाशिकच्या पथकाने कारवाई केल्याने सर्वत्र खळबळ ऊडाली. गौणखनिज विभागाने केलेल्या पाहाणीत सदर ठिकाणाहून ३ हजार ५७१ ब्रास उत्खनन विनापरवानगी झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणी चार दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या आदेशान्वये मंडळधिकारी बी. एन. पैठणकर यांना निलंबित आले. त्यानंतर पिंपरखेडचे तलाठी मलदुडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

- Advertisement -

येवल्याच्या प्रभारी प्रांत अर्चना पठारे यांनी निलंबानाचे आदेश काढताना त्यात अवैध क्रशरसह अन्य बाबतीत कामात हलगर्जी पणाचे कारण देत ही कारवाई केली. प्रशासनाने क्रशरप्रकरणी दोघा अधिकार्‍यांवर केली असताना सहा महिन्यांपासून अवैधपणे ऊत्खनन करणार्‍या क्रशरचालकांना दंडाची नोटीस बजावली आहे.

वसंत बाविस्कर अन्य ११ जणांना ही नोटीस बजावली असून त्यात बाजरमुल्याचा पाचपट दंड ३ कोटी २१ लाख ४० हजार ५०३ रूपये बजावला आहे. तर स्वामित्वधन २१ लाख ४२ हजार ७०० रूपये असून असे एकुण ३ कोटी ४२ लाख ८३ हजार २०३ रूपयांचा दंड करताना मंगळवारी (दि.२७) खुलाशासाठी मुदत देण्यात आली. या घटनेत प्रशासनाने दोघा अधिकार्‍यांबरोबरच क्रशर चालकावर कठोर कारवाई करणे अपेक्षित असताना केवळ दंडात्मक नोटीसचे सोपस्कार पार पाडणारे प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करते आहे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

- Advertisement -

 

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -