घरमहाराष्ट्रनाशिकमी कोणाची पतंग कापत नाही, पण माझ्याच पंतंगावर संगळ्यांचा डोळा: भुजबळ

मी कोणाची पतंग कापत नाही, पण माझ्याच पंतंगावर संगळ्यांचा डोळा: भुजबळ

Subscribe

येवल्यात पतंगोत्सवादरम्यान भुजबळांची राजकीय ‘काटा-काटी’

 नाशिक : येवला येथे संक्रांतीनिमित्त आमदार तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आसारीवर पतंग उडविण्याचा आनंद घेतला. या दरम्यान भुजबळांनी राजकीय फटकेबाजी करत अनेकांचे पतंग कापले. ‘मी कोणाचा पतंग कापण्याचा धंदा करत नाही, पण माझ्याच पतंगावर सगळ्यांचं लक्ष असतं आणि मी माझी पतंग वाचवता-वाचताच थकलो आहे’, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

येवला आणि पैठणी हे नाते सर्वश्रृत असले तरी पतंगोत्सव हे या शहराचे दुसरे वैशिष्ठ्य आहे. येवलेकर वर्षानुवर्षे या उत्सवात सहभागी होतात. भोगी, संक्रांत व कर अशा तिनही दिवस येवल्यात पंतगोत्सव साजरा केला जातो. भुजबळ हे येथील आमदार व जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी मात्र याला ‘ग्लॅमर’ दिले. मंत्री असताना प्रत्येक वेळेस भुजबळांनी थेट मुंबईहून येऊन पतंग उत्सवाला हजेरी लावतात. पैठणीसाठी उपयोगात आणले जाणारे रेशीम धागा गुंडाळण्यासाठी उपयोगात येणारी आसारी यासाठी प्रामुख्याने वापरली जाते.

- Advertisement -

शनिवारी येवला दौरयावर असलेल्या भुजबळांनी पतंगोत्सवात सहभागी होत थेट हाती रिळ घेत पतंग उडवण्याचा आनंद घेतला. यावेळी बोलतांना भुजबळांनी राजकीय फटकेबाजीही केली. सध्या आम आदमी पक्षाच्या नेत्या अंजली दमानिया भुजबळांविरोधात पुन्हा न्यायालयात गेल्या आहेत. याबाबत विचारले असता भुजबळ म्हणाले की, त्याबाबत एवढी काळजी करत नाही. न्यायालयाने आम्हाला केसमधून डिस्चार्ज केलं आहे. अनेकांचे पतंग कापले गेले आहेत.

आता तुम्ही कोणाची पतंग कापणार असा प्रश्न विचारला असता भुजबळ म्हणाले की, माझीच पतंग प्रत्येक जण कापण्यासाठी तयार असून, मी कोणाचा पतंग कापण्याचा धंदा करत नाही आणि माझ्याच पतंगावर सगळ्यांचं लक्ष असतं आणि मी माझी पतंग वाचवता-वाचताच थकलो आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -