घरCORONA UPDATEOmicron Variant: 'या' सहा देशात ओमिक्रॉनबाधितांची संख्या घटली; भारतात रुग्णसंख्या केव्हा घटणार?

Omicron Variant: ‘या’ सहा देशात ओमिक्रॉनबाधितांची संख्या घटली; भारतात रुग्णसंख्या केव्हा घटणार?

Subscribe

आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार, 12 जानेवारीपर्यंत अनेक राज्यांमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत सक्रिय रुग्णांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे.

जगभरात कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची दहशत पाहायला मिळतेय, मात्र गेल्या काही दिवसांपासून जगातील सहा देशांमध्ये ओमिक्रॉन संसर्गाचा वेग कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र भारतात अद्याप अशी परिस्थिती निर्माण झालेली नाही. रुग्णसंख्या कमी होत असलेल्या देशांमध्ये यूके, कॅनडा, इटली, आयर्लंड, डेन्मार्क आणि आइसलँड या देशांचा समावेश आहे. या देशांमध्ये कोरोना संसर्गाचा आलेख आता खाली घसरत आहे.

मात्रा भारतातून रुग्णसंख्या अजून कमी होत नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एका महिन्यापूर्वी इतर देशांमध्ये ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळू लागले होते. अशा परिस्थितीत भारतात येत्या काही आठवड्यांतचं कोरोनाची तिसऱ्या लाट येणार की नाही हे स्पष्ट होईल.

- Advertisement -

आकडेवारीनुसार, देशात सध्या कोरोनाची तिसरी लाट सुरू आहे, ज्यामध्ये दैनंदिन संसर्गाचा दर 16 टक्क्यांच्या पुढे गेला आहे आणि आठवड्याचा संसर्गही 13 टक्क्यांवर पोहचला आहे. गेल्या तीन दिवसांपासून देशात दररोज दोन लाखांहून अधिक रुग्ण समोर येत आहेत. त्याचवेळी, 7 ते 15 जानेवारी दरम्यान देशात 17.50 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

पाच टक्के रुग्ण रुग्णालयात भरती

यावर तज्ज्ञ रिजो म्हणाले की, भारतातील पाच टक्क्यांहून कमी रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येत आहे. मात्र, येत्या काही दिवसांत हा दर पाच टक्क्यांवरून दहा टक्क्यांवर पोहचण्याची भीतीही व्यक्त केली जातेय.

- Advertisement -

कोरोना संसर्ग वाढण्याची भीती

ते पुढे म्हणाले की, ओमिक्रॉनमुळे संसर्गाची नवीन लाट मागील लाटेपेक्षा अधिक प्रभावी दिसून आली आहे. अशा परिस्थितीत भारतातील कोरोना दुसऱ्या लाटेशी तुलना केल्यास कोरोनाचा प्रसार अधिक होण्याची शक्यता आहे. आरोग्य मंत्रालयाच्या अधिका-याने सांगितले की, जेव्हा ब्रिटनमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळला तेव्हा तेथे सुमारे सहा टक्के रुग्ण रुग्णालयात दाखल केले जात होते.

सक्रिय रुग्णांची संख्या अनेक पटींनी वाढली

आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार, 12 जानेवारीपर्यंत अनेक राज्यांमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत सक्रिय रुग्णांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे. उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाची सक्रिय प्रकरणे 14 पटीने वाढली म्हणजे रुग्णसंख्या 3,173 वरून 44,466 पर्यंत पोहचली आहे. तर पंजाबमध्ये 8.65, मध्य प्रदेशात 10.95 आणि बिहारमध्ये 11.27 टक्के रुग्ण वाढ झाली आहे.


children vaccine : महाराष्ट्रात लहान मुलांच्या लसींचा तुटवडा, केंद्राकडे पुरवठा करण्याचे आवाहन

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -