घरमहाराष्ट्रनाशिकताक, लस्सीसह लिंबू सरबताचा गोडवा महागाईने होतोय कमी

ताक, लस्सीसह लिंबू सरबताचा गोडवा महागाईने होतोय कमी

Subscribe

उन्हाच्या वाढत्या तीव्रतेने शीतपेयांना मागणी वाढली आहे. 

नाशिक : साखरेसह लिंबूच्या दरांत वाढ झाल्याने सामान्यांच्या आवाक्यातील लिंबू सरबताच्या गोडव्यालाही महागाईची झळ बसली आहे. ताक, लस्सी आणि ऊसाच्या रसाच्या किंमतीही वाढल्या आहेत.काही दिवसांपासून तापमानात सतत वाढ होत आहे. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेने शीतपेयांना मागणी वाढली आहे.

शहरात ठिकठिकाणी लिंबू सरबत, ऊसाचा रस, तसेच ताक, लस्सी विक्रेते आहेत. लहान मुले, तरुण व ज्येष्ठ याचा आस्वाद घेण्यासाठी येतात. मात्र, लिंबू, साखर, बर्फ, ऊस अशा वस्तूंच्या किंमती वाढल्याने त्याचा थेट परिणाम शीतपेयांच्या किंमतीवर झाला आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -