घरमहाराष्ट्रनाशिकदिव्यांग शिक्षकांची चाैकशी

दिव्यांग शिक्षकांची चाैकशी

Subscribe

नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्रांचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर आता दिव्यांग संघटना आक्रमक झाल्या आहेत. दिव्यांग प्रवर्गाचा आधार घेवून नोकरीस लागलेल्या सर्व कर्मचार्‍यांची चौकशी करण्याची मागणी प्रहार दिव्यांग संघटनेने केली आहे. दरम्यान, आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात आलेल्या दिव्यांग शिक्षकांचीही चौकशी करुनच त्यांना नियुक्ती देण्याचा निर्णय शिक्षण विभाग व प्रशासनाने घेतला आहे.

दिव्यांग प्रमाणपत्रांची त्रीसदस्यीय समीतीकडुन चौकशी करावी. तसेच केंद्रीय प्रणालीचे दिव्यांग युआयडी कार्ड सक्तीचे करावे, अशी मागणी प्रहार दिव्यांग संघटनेच्यावतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्याकडे करण्यात आली. तसेच जिल्हा व अंतर जिल्हा बदली साठी ज्या कर्मचारी व शिक्षकांनी दिव्यांग प्रमाण पत्र सादर केले आहे त्यांची ही पडताळणी करणे आवश्यक असल्याचे जिल्हाध्यक्ष ललित पवार यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -