घरठाणेघोडबंदरमधील खराब रस्त्यांच्या प्रश्नावर मंत्र्यांकडून चक्क सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची कानउघडणी

घोडबंदरमधील खराब रस्त्यांच्या प्रश्नावर मंत्र्यांकडून चक्क सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची कानउघडणी

Subscribe

ठाणे – घोडबंदरवरील रस्त्यांमुळे अनेक युवकांचा गेलेला बळी असो किंवा दोन-दोन तास वाहूक कोंडी असो याचा सर्वसामान्य ठाणेकरांना दररोज त्रास सहन करावा लागतो. यामुळे चार दिवसांपूर्वी याप्रश्नी मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. याची दखल मंत्र्यांनी घेतली असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची कानउघणी केली आहे. यामुळे आता अधिकारीही जागे झाल्याने या रस्त्यावरचे कामही सुरू झालेले पहायला मिळत आहे.

गेल्या दीड वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे घोडबंदरचा रस्ता असून ही या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम केले जात नव्हते. निधी नसल्यामुळे हे काम होत नसल्याचे अधिकाऱ्यांनी कारण पुढे केले. मात्र, ज्यावेळी मंत्र्यांनी या घोडबंदर रस्त्याची चौकशी केली असता, निधीचा प्रश्न नसल्याचे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे मंत्र्यांनी त्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेत कानउघडणी केली. आठ दिवसात या रस्त्याचे काम करण्याच्या सूचना दिल्या असून शुक्रवारपासून या मार्गावरील रस्त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू झाले आहे.

- Advertisement -

मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष जनहित व विधी विभागाचे स्वप्नील महिंद्रकर आणि उपशहर अध्यक्ष पुष्कर विचारे यांच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनानंतर अवघ्या चार दिवसात मंत्र्यांनी दखल घेत कामाला सुरूवात झाल्यामुळे नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे.

यावर एमएसआरडीएस प्राधिकरणाच्या अखत्यारित वाघबीळ,हिरानंदानी ईस्टेट, कापूरबावडी येथील पुलाचे दोषदायित्व कालावधी या महिन्यात संपत असून सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलांचे हस्तांतर एमएसआरडीसी कडून घेण्याअगोदर संबंधित पुलाच्या रस्त्याची डागडुजी संबंधित एमएसआरडीसीनी नियुक्त केलेल्या ठेकेदाराकडून करून घ्यावी. जेणेकरून या पुढे या पूलांच्य रस्त्यांचे नियोजन ठेवणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रीया मनसे जनहित विधी विभागाचे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -