घरमहाराष्ट्रनाशिककाझी गढीवरील रहिवाशांचे कोणत्याही क्षणी स्थलांतर

काझी गढीवरील रहिवाशांचे कोणत्याही क्षणी स्थलांतर

Subscribe

महापालिकेने बजावल्या अंतिम नोटिसा, गाडगे बाबा धर्मशाळेत सुविधा उपलब्धतेसाठी कर्मचारी दाखल

जिर्ण वाडे आणि भिंती कोसळून जिवीतहानी झाल्याच्या पार्श्वभूमीवर अत्यंत धोकादायक बनलेल्या काझी गढीवरील रहिवाशांचेही आता कोणत्याही क्षणी स्थलांतर करण्याची तयारी महापालिकेने सुरू केली. या रहिवाशांना याच परिसरातील गाडगेबाबा धर्मशाळेत हलविले जाणार असून, शुक्रवारी, ५ जुलैला सायंकाळी साडेसात वाजेपासून स्थलांतराच्या दृष्टीने सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी पालिकेचे कर्मचारी कार्यरत होते.

महापालिकेच्या नगररचना विभागाने गढीवरील रहिवाशांना नोटिसा बजावत कोणत्याही क्षणी स्थलांतर करण्याबाबत इशारा दिला होता. तसेच, जिल्हा प्रशासनानेही महापालिकेला पत्र देत गढीवरील रहिवाशांचा प्रश्न तातडीने प्रश्न मार्गी लावण्याची सूचना केली होती. या पार्श्वभूमीवर सावध पवित्रा घेत थेट स्थलांतराचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या येथील रहिवाशांसाठी मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी महापालिकेने तयारी सुरू केली. महापालिकेचे उपायुक्त, विभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत स्थलांतराची पूर्वतयारी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -