घरमुंबईग्रामीण भागात सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या मानधनात दुपटीने वाढ

ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या मानधनात दुपटीने वाढ

Subscribe

बीएएमएस डॉक्टरांच्या मानधनात दुपटीने वाढ करण्याचा अध्यादेश नुकताच जारी करण्यात आला.

राज्यातील कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या डॉक्टरांसाठी दिलासादायक बातमी आहे. ग्रामीण आणि आदिवासी पाड्यात वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या कंत्राटी बीएएमएस डॉक्टरांच्या मानधनात आता दुपटीने वाढ करण्यात आली आहे. यासंदर्भात सरकारी अध्यादेश नुकताच जारी करण्यात आला आहे.

आदिवासी आणि ग्रामीण भागात एमबीबीएस डॉक्टर सेवा द्यायला सरसावत नाहीत. त्यामुळे त्यांच्याजागी बीएएमएस म्हणजेच बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसीन अॅंड सर्जरी या डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे. पण, या डॉक्टरांना कमी मानधनात काम करावं लागत होतं. राज्याच्या आरोग्य विभागाने याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या डॉक्टरांना दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘स्मार्ट कार्ड’साठी एसटी महामंडळाची मुदतवाढ

आमदार निरंजन डावखरेंचे आरोग्यमंत्र्यांना पत्र

राज्य सरकारने कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या (वर्ग-अ) मानधनात वाढ केली आहे. त्यात एमबीबीएस डॉक्टरांचा उल्लेख आहे. पण, बीएएमएस डॉक्टरांचा उल्लेख केला नाही, अशा आशयाचं पत्र कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलं होतं. यावर डावखरे यांच्या मागणीची दखल घेत आता राज्य सरकारकडून कंत्राटी बीएएमएस डॉक्टरांच्या मानधनात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने सरकारी अध्यादेशही जारी केला आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असणारे कंत्राटी एमबीबीएस डॉक्टरांच्या धर्तीवर कोकणात रुग्णांना सेवा देणाऱ्या बीएएमएस डॉक्टरांच्या मानधनात वाढ करावी, अशी मागणी वैद्यकीय अधिकारी महासंघ संघटनेद्वारे करण्यात आली होती.

आदिवासी आणि दुर्गम भागात काम करायला एमबीबीएस डॉक्टर तयार होत नसल्याने त्याजागी सध्या बीएएमएस डॉक्टर कार्यरत आहे. दोघांच्याही कामाचं स्वरूप सारखंच असतानाही बीएएमएस डॉक्टर १५ ते १६ हजार रुपये मानधनावर काम करतात. या डॉक्टरांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार आता सरकारने या मागणीची दखल घेत डॉक्टरांना ४५ हजार एवढे मानधन देण्यात येणार असून अन्य भागात काम करणाऱ्या डॉक्टरांना ४० हजार एवढे मानधन मिळणार आहे.
डॉ. अरुण कोळी, अध्यक्ष, वैद्यकीय अधिकारी महासंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -