घरमहाराष्ट्रनाशिकमहावितरण उच्चदाब ग्राहकांसाठी 'के.व्ही.ए.एच.' बिलींग प्रणाली

महावितरण उच्चदाब ग्राहकांसाठी ‘के.व्ही.ए.एच.’ बिलींग प्रणाली

Subscribe

नाशिक शहर मंडळात विद्युत मीटर बदलण्याची प्रक्रीया सुरु; ३ हजार ६२८ मीटर ऑक्टोबर अखेरपर्यंत बदलणार

महावितरणच्या उच्चदाब व २० किलो वॅट (kW) वरील औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांसाठी पुढील काळात किलो व्होल्ट अँपीयर अवर (kVAh) बिलींग प्रणाली प्रस्तावित करण्यात आली असून राज्यभर १ एप्रिल २०२० पासून सुरु होणाऱ्या या प्रणालीसाठी तसेच ग्राहकांच्या सोयीसाठी अनुरूप असलेले मीटर लावण्याची पहिल्या टप्यातील प्रकिया नाशिक शहर मंडळ अंतर्गत सुरु झाली असून सुरु झाली असून यामध्ये ३ हजार ६२८ मीटर बदलण्यात येणार आहेत.

उच्चदाब आणि २० किलो वॅट पेक्षा जास्त भार असलेल्या ग्राहकांसाठी सोयीच्या असलेल्या किलो व्होल्ट अँम्पीयर (kVAh) बिलींग प्रणालीचा मुख्य उद्देश हा ग्राहकांनी पॉवर फॅक्टर १ ठेवावा, जेणेकरून वितरण हानी कमी होईल व विजेचा दर्जा वाढून उच्चत्तम गुणवत्तेची वीज मिळेल हा आहे. या प्रणालीत जास्त रिअॅक्टीव्ह पॉवर वापरणारया ग्राहकांना जास्त बिल भरावे लागणार असल्याने ग्राहकांना कमीत कमी रिअॅक्टीव्ह पॉवर वापरण्यासाठी ही प्रणाली प्रोत्साहीत करणारी आहे. याशिवाय या प्रणालीत प्रोत्साहन व दंड शुल्क वेगळी लावण्याची गरज नाही.

- Advertisement -

महावितरणने आपल्या व्यवस्थापन प्रणालीत बदलत्या गरजेनुसार अनेक ग्राहकाभिमूख बदल केले आहे. याचेच पुढील पाऊल ही के.व्ही.ए.एच. बिलींग प्रणाली आहे. ग्राहकांसाठी संपूर्णपणे नविन असलेल्या या प्रणालीबाबत ग्राहकांना माहीती देण्यासाठी व जनजागृतीसाठी महावितरण च्या वतीने राज्यभर मंडळनिहाय शिबीराचे आयोजन करण्यात येऊन यामध्ये या बिलींग प्रणालीबाबत सविस्तर माहीती दिली होती . यावेळी उपस्थित ग्राहकांच्या प्रश्नांचे उत्तरे देऊन शंकाचे निरसनही करण्यात आले होते. त्यामुळे नाशिक शहर मंडळात एजन्सी नेमण्यात येऊन या प्रणालीकरिता अनुरूप विद्युत मीटर लावण्याची प्रकिया सुरु झाली असून पहिल्या टप्यात ३० ऑक्टोबरपर्यंत मीटर बदलण्यात येणार आहेत. तरी संबंधित ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन नाशिक शहर मंडळाचे अधिक्षक अभियंता प्रवीण दरोली यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -