घरमहाराष्ट्रनाशिक‘ऑनलाइन पेमेंट’मध्ये एसटी कर्मचारी मागास

‘ऑनलाइन पेमेंट’मध्ये एसटी कर्मचारी मागास

Subscribe

नाशिक विभागीय कार्यशाळेतील प्रकार; आरटीओ विभागाने दिलेल्या सूचनांचा विसर

नाशिक बचत करून कमी मनुष्यबळात काम मार्गी लावण्यासाठी ऑनलाईन प्रणालीचा अंगीकार बहुतांश शासकीय कार्यालयांनी केला आहे. मात्र, एसटी महामंडळ यातून कात टाकताना दिसून येत नाही. एसटीची अनेक कामे अजूनही कागदपत्रांच्या ढिगार्‍यातच सुरू आहेत. ऑनलाईन काम करताना एसटी कर्मचार्‍यांची कशी पंचायत होते, याचा प्रत्यय नाशिक विभागीय कार्यशाळेत आला. आरटीओ पासिंगचे शुल्क ऑनलाईन भरण्यासाठी एसटी कर्मचार्‍यांना संगणक दिले असले तरी त्यांना संगणक ज्ञान नसल्याने आजघडीला रोख रक्कमच भरण्यात वेळ आणि मनुष्यबळ वाया घालवले जात असल्याचे दिसून येत आहे, शिवाय हे संगणकही अद्याप धुळखात आहे.

आरटीओकडून एसटी गाड्यांचे परीक्षण करून घेण्यासाठी नशिक विभागीय कार्यशाळेला हाकेच्या अंतरावर जावे लागते. मात्र, आरटीओच्या ऑनलाईन कार्यप्रणालीला जोडून काम करणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात एसटी कर्मचार्‍यांना संगणक अज्ञानामुळे हे काम जमत नसल्याचे दिसून येत आहे. पेठरोड येथील एसटीच्या विभागीय कार्यशाळेत जिल्ह्यातील 13 डेपोंच्या बसगाड्यांचे मशिन दुरुस्ती, अपघातानंतर गाड्यांची दुरुस्ती, त्याचबरोबर रंगरंगोटी, कुशनिंग, इलेक्ट्रीक कामे केली जातात. यातील बहुतेक कामे आरटीओ पासिंगच्या संबंधित असल्याने दर दिवसाला आरटीओच्या निकषानुसार गाडी तयार करून ती पासिंगला पाठविण्याचा हा सोपस्कार एसटी कर्मचारी तांत्रिक कौशल्यामुळे पार पाडतात. पण, अधिकारी आणि त्यांच्या सहाय्यक स्तरावर कर्मचार्‍यांना संगणक हाताळता येत नसल्याने आरटीओची ऑनलाईन कामे आजही त्यांच्या आवाक्याबाहेर आहेत.

- Advertisement -

आरटीओने कुठल्याही कामाची शुल्क आकारणी आता ऑनलाईन आरटीजीएस, एनईएफटी, आयएमपीएस आदी प्रकारांत अनिवार्ह केली आहे. त्यामुळे एसटीच्या पासिंगचा खर्चही विभागीय कार्यशाळेला आता ऑनलाईनच जमा करणे क्रमप्राप्त आहे. पूर्वी कार्यशाळेतून पासिंग किंवा इतर कोणतेही आरटीओ शुल्क पावत्यांद्वारे भरले जात होते. त्यानंतर गाड्या आरटीओच्या परीक्षणासाठी पाठविल्या जात होत्या. हीच प्रक्रिया येथील अधिकारी व कर्मचार्‍यांकडून पूर्वीपासून सुरू होती. आता आरटीओने ऑनलाईन शुल्क भरण्याचे फर्मान सोडल्याने एसटी कार्यशाळेतील व्यवस्थापनाला ते ऑनलाईन भरणे अनिवार्ह आहे, मात्र, तसे होत नसल्याने पासिंग प्रक्रिया रखडतेय.

संगणक धूळखात

कार्यशाळेत संगणक आणले आहे, पण ते ऑपरेट करायचे कोणी, असा प्रश्न अधिकार्‍यांना पडला आहे. कारण संगणक प्रणाली, ऑनलाईन सेवा आणि इंटरनेट बँकिंग हे तंत्रज्ञान कोणालाच माहित नसल्याने कार्यशाळेतील संगणक धुळखात आहे. त्यामुळे एसटीला गाड्यांचे पासिंग शुल्क रोख रकमेद्वारेच भरावे लागत आहे, याला आरटीओकडून मात्र नकार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -