घरमहाराष्ट्रनाशिक'मविप्र'चे नवनिर्वाचित सरचिटणीस अ‍ॅड.ठाकरेंचे पारदर्शक कारभाराचे आश्वासन

‘मविप्र’चे नवनिर्वाचित सरचिटणीस अ‍ॅड.ठाकरेंचे पारदर्शक कारभाराचे आश्वासन

Subscribe

मविप्र अखेरच्या सर्वसाधारण सभेतील निर्णयांचा फेरविचार; दैनिक आपल महानगरच्या नाशिक कार्यालयाच्या "वंदे मातरम बाप्पा"च्या आरतीसाठी विशेष उपस्थिती

किरण कवडे । नाशिक

मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी सुरु असताना त्याच दिवशी झालेल्या सर्वसाधारण सभेत घेतलेल्या वादग्रस्त निर्णयांचा फेरविचार करण्यात येणार असल्याची महत्वपूर्ण माहिती संस्थेचे सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना दिली. यापूर्वी झालेल्या कारभारात काही गडबडी झाल्याचे निदर्शनास आले असून संबंधित प्रकरणांची चौकशी करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘आपलं महानगर’च्या नाशिक कार्यालयात बुधवार (दि.31) गणरायाची आरती अ‍ॅड. ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आली. आरतीनंतर त्यांनी ‘आपलं महानगर’शी संवाद साधला. ते म्हणाले, मविप्र समाज शिक्षण संस्थेच्या निवडणुकीची मतमोजणी 29 ऑगस्ट रोजी सुरू असताना दुसर्‍या बाजूला संस्थेच्या सर्वसाधारण सभेत काही ठराव करण्यात आले. माजी सरचिटणीस नीलिमा पवार यांची कन्या अमृता पवार यांना तज्ज्ञ संचालक म्हणून संस्थेत घेण्याचा ठराव करण्यात आला. तसेच, प्रणव पवार यांनाही कोरोना योध्दा पुरस्कार देण्याचा ठराव सभासदांनी केला आहे.

- Advertisement -

याविषयी अ‍ॅड. ठाकरे म्हणाले, शेवटच्या सभेत केलेले ठराव हे राजकीय आकांक्षापोटी घेतले जातात. या ठरावांविषयी फेरविचार करण्यात येईल. गेल्या पाच वर्षात झालेल्या कारभाराची चौकशी करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. हे करतानाच पुढील पाच वर्षे पारदर्शकपणे काम करणार आहोत. निवडणुकीत सुप्त लाट होती, हे मतदारांनी दाखवून दिले. त्यामुळे सत्ताधार्‍यांना मतदारांनी पूर्णपणे नाकारले. अध्यक्षपदाचा उमेदवार अगदी काही मतांनी पराभूत झाला. पण उर्वरित सर्व पॅनल हे मोठ्या मताधिक्यांनी निवडून आले, ही त्यांच्या कारभाराची पावतीच सभासदांनी त्यांनी दिली. संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयात सभासदांच्या पाल्यांना जास्तीत जास्त प्रवेश कसा देता येईल, यादृष्टीने आम्ही प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

‘महानगरवर शिक्कामोर्तब’

मविप्र निवडणूक काळात ‘आपलं महानगर’ने घेतलेल्या निष्पक्षपाती भूमिकेचे सरचिटणीस अ‍ॅड.ठाकरे यांनी अभिनंदन केले. सत्ताधारी किंवा विरोधक यापैकी कुणाचीही बाजू न घेता सत्य जनतेसमोर मांडले पाहिजे. हाच पत्रकारितेचा धर्म आहे आणि आपलं महानगरने हा धर्म निभावल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -