घरमहाराष्ट्रधनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला गालबोट; गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पोलिसांकडून लाठीचार्ज

धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला गालबोट; गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पोलिसांकडून लाठीचार्ज

Subscribe

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे(dhanjay munde) यांच्या परळी मध्ये सुद्धा गणेशोत्सवानिमित्त लावणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच कार्यक्रमात बेभान झालेल्या तरुणावर पोलिसांना लाठीचार्ज केला. 

मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे कोणताच सण साजरा करण्यात आला नव्हता. पण यावर्षी मात्र सर्वच सणांवरचे निर्बंध हटण्यात आल्याने या गणेशोत्सव सुद्धा जल्लोषात साजरा केला जात आहे. सर्वच भक्त गणरायाची आतुरतेने वाट पाहत होता. सगळेच जण बाप्पाचा यथोचित पाहुणचार करत आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे(dhanjay munde) यांच्या परळी मध्ये सुद्धा गणेशोत्सवानिमित्त लावणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच कार्यक्रमात बेभान झालेल्या तरुणावर पोलिसांना लाठीचार्ज केला.

हे ही वाचा –  महिलेला मारहाण करणार्‍या मनसे पदाधिकार्‍याला तात्काळ अटक करावी, महेश तपासेंची मागणी

- Advertisement -

धनंजय मुंडे(dhanjay munde) यांच्या परळीमधील नाथ प्रतिष्ठानच्या गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. धनंजय मुंडे(dhanjay munde) यांच्याच हस्ते या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी गोंधळ झाला. कार्यक्रमासाठी आलेल्या कलाकारांना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आणि त्यामुळे गोंधळाचं वातावरण झालं आणि तोच गोंधळ थांबविण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला अशातच काही अति उत्साही तरुणांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला.

हे ही वाचा – डोंगरे मैदानावर एकाच वेळी तीन कार्यक्रमांमुळे तारांबळ

- Advertisement -

गणेशोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेले कार्यक्रम हे आठ दिवस होणार आहे. यात मराठी चित्रपट सृष्टीतील सोनाली कुलकर्णी(sonali kulkarni), हेमांगी कवी(hemangi kavi), प्राजक्ता गायकवाड आणि तेजा देवकर या आघाडीच्या अभिनेत्रींनी वेगवेगळ्यत गाण्यांवर डान्स केला. तोच पाहण्यासाठी अनेक तरुणांनी गर्दी केली होती आणि एकच गोंधळ उडाला. हा सगळा प्रकार थांबिण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्या लाठीचार्ज मध्ये काही तरुण जोखमी झाले. लाठीचार्ज केल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी तिथून काढता पाय घेतला. या सर्व प्रकारामुळे सांस्कृतिक कार्यक्रमाला गालबोट लागलं हा सर्व प्रकार गणपतीच्या पहिल्याच दिवशी झाला.

हे ही वाचा – मुंबादेवी परिसरात बॅनर लावण्यावरून मनसे कार्यकर्त्यांची महिलेला मारहाण, व्हिडीओ व्हायरल

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -