घरमहाराष्ट्रनाशिककार-ट्रॅक्टर अपघातात एक ठार, दोन जखमी

कार-ट्रॅक्टर अपघातात एक ठार, दोन जखमी

Subscribe

देवळा-कळवण रोडवरील भऊर फाट्याजवळील अपघात

देवळा- भऊर फाट्याजवळ असलेल्या पेव्हर ब्लॉक कारखान्यासमोर गुरुवारी (दि.२१) रात्री ११ वाजेच्या सुमारास कार व ट्रॅक्टर यांच्यात भीषण अपघात झाला. त्यात एक जागीच ठार, तर दोन प्रवाशी जखमी झाले.

या अपघातात विनय रमेश पाटील (वय २८, रा. मोकभणगी, ता. कळवण) या तरुणाचा मृत्यू झाला. तर, यशवंत पवार (वय ४२)व सुखदेव गायकवाड (वय-३५, दोघे रा. शिरसमणी) हे जखमी झाले. त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी मालेगावला खासगी दवाखान्यात हलविण्यात आले. शिरसमनी (ता. कळवण) येथील शेतकरी एकासोबतच देवळा येथे मेथीची भाजी विकून ट्रॅक्टरने कळवणकडे जात होते. याचवेळी भऊर फाट्याजवळ देवळ्याकडून कळवणकडे जाणाऱ्या कारने (एम एच-४१, एझेड-४५१) ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली. यामुळे ट्रॅक्टर जागीच फिरून ट्रॉलीपासून स्वतंत्र झाले आणि रस्त्याकडेला उलटला. तर, कारचा पुढचा भाग पूर्णपणे चेपला गेला. त्यात कारमधील विनय रमेश पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

- Advertisement -

पाटील यांना तातडीने देवळा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांना मृत घोषित करण्यात आले. विनय पाटील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी तज्ज्ञ संचालक पांडुरंग पाटील यांचे नातू, तर भऊर येथील अभियंता रमेश पाटील यांचा एकुलता एक मुलगा होता. पुढील तपास पोलीस निरीक्षक देविदास भोज यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रामदास गवळी करत आहेत.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -