घरमहाराष्ट्रनाशिकओझर नगरपरिषदेचा गुरुवारी फैसला

ओझर नगरपरिषदेचा गुरुवारी फैसला

Subscribe

अनिल कदम यांची प्रतिष्ठा पणाला, निफाड तहसीलदारांची प्रशासक म्हणून नियुक्ती

ओझर : निफाड तालुक्याचे माजी आमदार अनिल कदम यांच्यासाठी प्रतिष्ठेचा विषय बनलेल्या ओझर नगरपरिषदेचा अंतिम निकाल येत्या 7 ऑक्टोबर रोजी लागण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी, न्यायालयाच्या आदेशानुसार निफाडचे तहसीलदार यांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाल्यामुळे येथील कर्मचारी व नागरीकांच्या समस्या सूटण्यास मदत होणार आहे.

डिझेलचे पैसे थकल्याने कचरागाड्या जागेवरच उभ्या आहेत. परिणामी शहरात कचर्‍याचे ढीग साचत असून, पावसामुळे परिसरात दुर्गंधी तयार होऊ लागली आहे. राजकीय नेत्यांच्या स्पर्धेत सामान्य नागरिकांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर 17 सप्टेंबर रोजी न्यायालयात सुनावणी झाली. त्यानंतर दोन वेळा सुनावणी होऊनही अंतिम निकाल 7 ऑक्टोबर रोजी येण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

माजी आमदार कदम आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य यतिन कदम यांच्यात कलगितुरा रंगलेला आहे. त्यामुळे अनिल कदम यांना कोणत्याही परिस्थितीत ओझर नगरपरिषद करावी लागेल. शहराची लोकसंख्या विचारात घेतली तर नगरपरिषद होण्यास काहीच अडचणी नाही. परंतु, तांत्रिक बाबी पूर्ण करण्याचे खरे आव्हान अनिल कदम यांच्यासमोर निर्माण झाले आहे. राजकीय संघर्ष सुरु असताना दुसरीकडे कचरागाड्या बंद आहेत.

चार दिवसांनी होणारा पाणी पुरवठा, डासाच्या वाढत्या प्रमाणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रस्ते खड्डेमय झाले आहेत. मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून नागरिक त्रस्त आहेत. नागरी समस्या वाढत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यातच कर्मचार्‍यांना खर्च करण्याचे अधिकार नसल्यामुळे समस्या सोडविण्यासाठी लागणारे साहित्य कार्यालयात शिल्लक नाही. नवीन साहित्य खरेदी करण्याचा अधिकार नाही.प्रशासक आल्यानंतर तरी कर्मचारी वर्गाचे थकीत वेतन निघेल आणि नगरपरिषद हद्दीतील कचरा तसेच पथदीप दुरुस्ती आणि खराब झालेल्या रस्त्यांचे काम मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे.ओझरला नगरपरिषद की ग्रामपंचायत याबाबत निकालाच्या प्रतीक्षेत जनता भरडली जात आहे. नेते मंडळीने जनतेसाठी पुढे येत प्रश्न व समस्या सोडवाव्या ही जनता जनार्दनाची माफक अपेक्षा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -