घरमहाराष्ट्रनाशिकपोलीस उपनिरीक्षकाने केली राजेंद्र डोखळेंना मारहाण

पोलीस उपनिरीक्षकाने केली राजेंद्र डोखळेंना मारहाण

Subscribe

निफाड बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर घडली घटना

पिंपळगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक भरत चौधरी यांनी शनिवारी (२२ जून) दुपारी साडेबाराच्या सुमारास निफाड बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर गाडीत बसलेले जेष्ठ नेते तथा लासलगाव बाजार समिती संचालक राजेंद्र डोखळे यांना शिवीगाळ करून गाडीतून बाहेर ओढून मारहाण केल्याची घटना घडली.

राजेंद्र डोखळे यांना निफाड पंचायत समिती माजी सभापती सुभाष कराड यांच्या बरोबर बाहेर जायचे होते असल्याने ते  निफाड बाजार समिती प्रवेशद्वारावर वाट बघत होते. यावेळी नव्याने रूजू झालेले चौधरी हे कारने बाजार समितीत प्रवेश करत होते. यावेळी झालेल्या वाहतूक कोंडीमुळे दोघांत वाद झाला. यातून उपनिरीक्षक चौधरी यांनी डोखळे यांना शिवीगाळ करत गाडीतून बाहेर काढले व मारहाण करण्याचा प्रयत्न केला. सरकारी कामात अडथळा आणल्याचा खोटा गुन्हा दाखल करतो, अशी दमबाजी केली. निफाडचे पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड यांनी नाट्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. याबाबत डोखळे यांनी निफाड पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक भरत चौधरी यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली. तर चौधरी यांनीही सायंकाळी सात वाजता निफाड पोलीस ठाण्यात डोखळे यांच्याविरोधात फिर्याद दाखल केल्याचे समजते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -