घरमहाराष्ट्रनाशिकसहा महिन्यांत रोखले १८ बालविवाह

सहा महिन्यांत रोखले १८ बालविवाह

Subscribe

चाईल्ड लाईनसह पोलिसांची कारवाई; तक्रारदारांची संख्या वाढली

राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांना लाजवतील इतके बालविवाह नाशिक जिल्ह्यात सुरु असल्याची बाब चाईल्ड लाईन, बालकांशी संबंधित शासकीय संस्था आणि पोलीस यांनी केलेल्या कारवाईतून पुढे आली आहे. गेल्या सहा महिन्यांत जिल्ह्यात तब्बल १८ बालविवाह रोखण्यात चाईल्ड लाईनला यश आले आहे. ज्या बालविवाहांची माहिती पुढेच आली नाही अशांचा विचार करता बालविवाहमुक्त जिल्ह्याच्या संकल्पनेला पूर्णत: छेद दिला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्थात बालविवाहाविरोधातील जागृती वाढल्याने तक्रारदारांची संख्याही वृध्दींगत झाल्याचे चाईल्ड लाईनच्या पाहणीतून पुढे आले आहे.

महाराष्ट्रात १०० पैकी तब्बल २५ मुलींचे बालविवाह होत असल्याची धक्कादायक बाब राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणात काही वर्षापूर्वी आढळून आली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा बाल संरक्षण कक्ष, महिला व बालविकास, बालकल्याण समिती आणि चाईल्ड लाईनच्यावतीने बालविवाह रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात झाली. या अभियानास प्रारंभीच्या काळात मिळणारा प्रतिसाद बघता बालविवाहमुक्त जिल्हा म्हणून लौकीक मिळवण्यासाठी दस्तुरखुद्द जिल्हाधिकार्‍यांनी प्रयत्न सुरु केले. मात्र कुटूंबातील अठरा विश्व दारिद्य्र आणि ‘मुलगी म्हणजे काचेची बाटली, तिला सांभाळणे कठीण’, या बुरसटलेल्या संकल्पनेमुळे बालविवाहांना चालना मिळत असल्याचे चाईल्ड लाईनच्या वतीने सांगण्यात आले.

सहा महिन्यांत रोखले १८ बालविवाह
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -