घरमहाराष्ट्रनाशिकइगतपुरीत माऊंटन शॅडो रिसॉर्टवर छापा

इगतपुरीत माऊंटन शॅडो रिसॉर्टवर छापा

Subscribe

हुक्का पार्टी करणार्‍या २० तरुणींसह ५५ तरुणांना अटक

इगतपुरी : रेव्ह पार्टीसह विविध पार्ट्यांसाठी प्रसिद्ध असलेला इगतपुरी तालुका रविवारी (दि.१३) हुक्का पार्टीने पुन्हा एकदा हादरला. या पार्टीचे आयोजन एका नामांकित कंपनीने त्रिंगलवाडी हद्दीतील पारदेवी येथील माऊंटन शॅडो रिसॉर्टमध्ये आयोजित केली होती. या रिसॉर्टवर छापा टाकत नाशिक ग्रामीण पोलिसांनी पार्टी करणार्‍या २० तरुणींसह ५५ तरुणांना अटक केली.पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ग्रामीण पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास हा छापा टाकला.

त्यात दम मारो दम या गाण्याच्या तालावर ठेका धरलेल्या ७५ व्यक्तींना पोलिसांनी रंगेहात अटक केली. त्यांच्याविरुद्ध इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.या घटनेत मुख्य संशयित मनीष नयन झवेरीया (वय ५२, रा. विलेपार्ले, मुंबई), माऊंटन शॅडो रिसॉर्टचा मालक महेंद्र डोसाभाई मोमाया शहा (रा. शरणपूर रोड, नाशिक), रिसॉर्टचा व्यवस्थापक अमर मोरे (रा. श्रीवर्धन, जि. रायगड), पार्टीचा आयोजक आशिष छेडा (रा. दहीसर, मुंबई) व केतन गडा (रा. कांदिवली, मुंबई) यांच्यासह देहविक्रीसाठी महिला पुरविणार्‍या दीपाली महेश देवळेकर (रा. मुंबई) व शिल्पा कुरेशी (रा. मुंबई) हे संशयित असल्याचे सांगण्यात आले.

- Advertisement -

दीपाली व शिल्पा यांनी त्यांच्यासमवेत १८ महिलांना देहविक्रीसाठी आणल्याचे निष्पन झाले आहे. या महिलाही हुक्का पार्टीत सहभागी झाल्याचे आढळून आले. बेकायदेशिररित्या हुक्का पार्टी, विदेशी मद्य सेवनाचे व मानवी शरीरास हानीकारक तंबाखुजन्य पदार्थांचे धुम्रपान करताना आढळून पोलिसांनी पंचनामा करत गुन्हा दाखल केला.कारवाईवेळी नाशिक ग्रामीण पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने सदर संशयित आरोपींकडुन हुक्का, महागडी विदेशी दारू, हुक्का फ्लेवर इ. मुद्देमाल हस्तगत केला.

इगतपुरीत अनेक हॉटेलांनी रेव्हपार्टी, हुक्का पार्टी अशा प्रकारांमुळे हा भाग सातत्याने चर्चेत राहिलेला आहे. दरम्यान, पोलिसांनी या सर्व आरोपींची वैद्यकीय चाचणी करून अटक केली. सोमवारी (दि.१४) या सर्व संशयितांना इगतपुरी न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांनी दिली. संशयित धनिक व्यापारी असल्याचे सांगण्यात आले.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -