घरमहाराष्ट्रनाशिकराऊतांचे आरोप बोरस्तेंच्या जिव्हारी; बडगुजरांचा पलटवार

राऊतांचे आरोप बोरस्तेंच्या जिव्हारी; बडगुजरांचा पलटवार

Subscribe

नाशिक : खासदार संजय राऊत यांनी नाशिक दौर्‍यात केलेले आरोप बोरस्तेंच्या फार जिव्हारी लागलेले दिसतात. बोरस्तेंच्या प्रवेशावेळी बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, हा चायनीज माल आहे. जास्त काळ आपल्या पक्षात टिकणार नाही. त्याचा डीएनए चेक केला पाहिजे. या प्रसंगाची आठवण राऊत साहेबांनी करुन दिली. त्याचा बोरस्तेंना राग आला आणि त्या भावनेतून पत्रकार परिषद घेतली, असा पलटवार शिवसेनेच्या ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केला. या आरोपात कुठलेही तथ्य नसल्याचेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.

यापूर्वी पाच वर्षे विरोधी पक्षनेता असताना आपणच त्यांचे बगलबच्चे होते. त्यांच्यासोबत बसले उठणे नेहमी होते. आज मात्र ते आपल्याला वाईट दिसतात. पक्ष सोडताना कोणावर तरी टीका करावी लागते त्या भावनेतून आपण राऊतांवर टीका करत आहात. नेते पैसे घेतात म्हणून आरोप केले गेले. आपण १० वर्षे पक्षात मुख्य पदावर होते. आपण किती पैसे दिले- घेतले याचे स्पष्टीकरण आपल्याला करावे लागेल. नेत्यांनी जर पैसे घेतले असते आपणही पाच वर्षे त्या पदावर राहू शकले नसते याचा विचार आरोप करण्यापूर्वी करावा. त्यामुळे चुकीचे आरोप नेत्यांवर करू नका. आपल्या मर्यादेत रहावे. राजकारणाची इभ्रत घालवू नये.

- Advertisement -
विनायक पांडेंकडेही कागदपत्रे

शिवसेना कार्यालयाशीसंबंधित कागदपत्रे हे पालकरांप्रमाणेच विनायक पांडे यांच्याकडेदेखील आहेत. शिवाय, कार्यालयाची घरपट्टी, वीजबिल हे शिवसेना कार्यालयाच्या नावानेच येते. त्यामुळे या कार्यालयावर अन्य कुणी अधिकार दाखवण्याचा संबंध येत नाही. विरोधकांकडे मुद्दे नसल्याने असे बिनबुडाचे दावे केले जात असल्याचे बडगुजर यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -