घरक्राइमस्वयंपाक करताना सिलिंडर स्फोट; आईसह ३ मुले जखमी

स्वयंपाक करताना सिलिंडर स्फोट; आईसह ३ मुले जखमी

Subscribe

नाशिक : शाळेत जाणार्‍या मुलांसाठी जेवणाचा डबा तयार करताना अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. यामध्ये घटनेत आईसह तीन मुले जखमी झाली. ही घटना सोमवारी (दि.९) सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास जेलरोडवरील नारायण बापू चौकाजवळ, विठ्ठल मंगल कार्यालयासमोर घडली. सिलिंडरच्या स्फोटाचा आवाजामुळे नागरिक भयभीत झाले होते. नाशिकरोड येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणत जखमींना उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. सुगंधा सोळंकी (वय ५०), रुद्र (वय 5), आर्यन व सूर्या अशी जखमींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेलरोड येथील नारायण बापुनगर परिसरात पुंजाजी लोखंडे यांचे भाड्याने दिलेल्या खोल्या आहेत. या ठिकाणी सोमवाारी सकाळी सुगंधा सोळंकी मुलांच्या जेवणाची तयारी करीत होत्या. त्यावेळी अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला.या स्फोटामुळे घराचे पत्रे उडाले. त्यावेळी लागलेल्या आगीमध्ये सुगंधा सोळंकी या 50 टक्के भाजल्या. त्यांची मुले रुद्र 15 टक्के भाजला, तर आर्यन व सूर्या ही दोन मुले पाच टक्के भाजली. स्फोटात गंभीर जखमी झालेल्या महिलेला आणि तिच्या मुलांना महापालिकेच्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याठिकाणी प्रथमोपचार करुन त्यांनतर त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
स्फोट झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलास दिली. त्यानंतर नाशिकरोड येथील केंद्रातील एक बंब घटनास्थळी पोहचला होता.अग्निशमन दलाचे कर्मचारी श्रीकांत नागपुरे, सुभाष निकम, शांताराम गायकवाड, रामदास काळे, मनोज साळवे, अशोक मोदीयानी यांनी मदतकार्य करून आग आटोक्यात आणली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -