घरमहाराष्ट्रनाशिकउत्तराखंड मध्ये अडकलेल्या नाशिककरांची सुटका

उत्तराखंड मध्ये अडकलेल्या नाशिककरांची सुटका

Subscribe

खासदार गोडसे यांची तत्काळ मदत; उत्तराखंडला अडवणूक

नाशिक : चारधाम यात्रेसाठी जात असलेल्या जिल्ह्यातील 35 भाविकांकडे आरटीपीसीआर रिपोर्ट व पहिला डोस घेतल्याचे प्रमाणपत्र सोबत असतानाही त्यांना उत्तराखंड येथील रुद्रप्रयाग येथे अडवण्यात आले. त्यांची बळजबरीने पुन्हा अ‍ॅण्टीजेन टेस्ट केली. 34 भाविकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले; परंतु, एकाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या व्यक्तीची पुन्हा आरटीपीसीआर टेस्ट केल्यानंतर ती निगेटिव्ह आली. तरीदेखील त्यांना १४ दिवसांकरीता कॉरंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मला सचिन लोंढेचा फोन आला व त्या अडकलेल्यांपैकी सामाजिक कार्यकर्त्या गितांजली गाजरे-जाधव माझ्याशी कॉन्फरन्स कॉलवर बोलल्या. १० ते१२ तासांपासून वैतागल्याचे त्यांनी सांगितले. अनेकदा फोन करुनही मदत मिळत नसल्याची विनंती त्यांनी केली. यादरम्यान खासदार हेमंत गोडसे यांना फोन केला आणि ते मिटिंगमध्ये असतानाही त्यांनी तातडीने पांडे यांच्याशी बोलून तातडीने मदत करण्याचे आवाहन केले. त्यांनी केलेल्या सूचनेनंतर जिल्हाधिकारी, संसद भवन व महाराष्ट्र सरकार असे जवळपास 25 फोन आले. त्या सर्वांनी भाविकांची विचारपूस केली. त्र्यंबकराज्याच्या कृपेने सर्व भाविक सुखरुप असल्याचे या भाविकांनी आपल्या कुटुंबियांना सांगितले.

- Advertisement -

चारधाम यात्रेतील भाविक

प्रीतम पवार, धर्मेंद्र उपाध्याय, निशा उपाध्याय, सचिन जाधव, गीतांजली गाजरे-जाधव, मोहिनी गाजरे, किरण धनक, सुनीता धनक, मुनीलाल कनोजिया, शकुंतला कानोजिया, कुसुम चितोडीया, अरुणा काळे, रतन गवळी, रंजना करांकळ, तुषार पाटील, नेहा पाटील, संध्या वानखेडे, ललिता खरे, आरोही वानखेडे, उमेश सांगळे, मीना शिंदे, गोपीनाथ उतेकर, सुषमा हिंडलेकर, निहार बनसोडे, शशिकला बनसोडे, प्रदीप बनसोडे, सुनीता उतेकर, हेमा माखवा, नथु पाटील, आशा पाटील, त्रिंबक सावळे, दुर्गा सावळे, रंजना पाटील, स्नेहा.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -