पोलिसांच्या माहितीनुसार, १८ मे ते २५ मे २०१९ या कालावधीत प्रज्वल श्रीकृष्ण मेश्राम याने अल्पवयीन मुलीवर राहत्या घरी अत्याचार केला. त्यावेळी त्याने मोबाईलमध्ये मुलीचे अश्लील फोटो काढले. ते फोटो तिच्या आई व भावास दाखविण्याची धमकी देत त्याने तिच्यावर वारंवार अत्याचार केला. त्यातून ती मुलगी गरोदर राहिली. याप्रकरणी नराधमावर पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक डी. एस. पाटील करत आहेत.