घरमहाराष्ट्रनाशिकवंजारी समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण हवे

वंजारी समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण हवे

Subscribe

व्ही.एन.नाईक आरक्षण कृती समितीची मागणी

वंजारी समाजातील घटक ऊसतोडणी कामगार, शेतमजुर, हमाल, शेतकरी आहे. हा समाज देशात ओबीस तर राज्यात व्हीजेएनटी प्रवर्गात गणला जातो. राज्यात वंजारी समाज शैक्षणिक, आर्थिकदृष्टया मागासलेला आहे.समाजाला एनटी अंतर्गत ड गटात केवळ 2 टक्के आरक्षण आहे. हे आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणात शासनाने लागू करावे, अशी मागणी क्रांतीवीर व्ही.एन.नाईक आरक्षण कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

कॉलेजरोड परिसरात वंजारी समाजाच्या आरक्षणासाठी कृती समितीची स्थापना करण्यात आली. त्यावेळी झालेल्या बैठकीत आ.नरेंद्र दराडे,आ.किशोर दराडे, अ‍ॅड.पी.आर.गिते, हेमंत धात्रक, कोंडाजी आव्हाड आदींसह वंजारी समाजातील कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होेते.

- Advertisement -

आ.नरेंद्र दराडे यांनी वाढीव आरक्षणाची मागणी करताना पत्रकार परिषदेत सांगितले की, सध्या 2 टक्के आरक्षण हे त्रोटक आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी त्यावेळी लढा दिला होता. त्यामुळे वंजारी समाजाला व्हीजेएनटी प्रवर्गात 2 टक्के आरक्षण मिळाले होते. मात्र, हे आरक्षण तोकडे असून सध्या समाजातील अनेक नागरिक शैक्षणिक, आर्थिक विकासापासून वंचित आहे. त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने वंजारी समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे, या मागणीसाठी प्रथम जिल्हानिहाय कृती समिती दौरा करणारे असून त्यानंतर राज्यातून दौरा काढून मुख्यमंत्र्यांना आरक्षणाची मागणी करण्यात येणार आहे, असे आ.दराडे म्हणाले.

अ‍ॅड.पी.आर. गिते यांनी आरक्षणाची पार्श्वभूमी सांगताना म्हटले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार राज्य सरकारने वंजारी समाजाला व्हीजीएनटी प्रवर्गातील ड गटात 2 टक्के आरक्षण दिलेले होते.त्यासाठी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना लढा द्यावा लागला होता.पण आता सरकारने जातनिहाय जनगणना करून वंजारी समाजाला वाढीव आरक्षण देण्याची मागणी गिते यांनी केली.

- Advertisement -

हेमंत धात्रक यांनी वढीव आरक्षणाची मागणी करताना म्हटले की, शहरातील वंजारी समाजाचे विकासाचे चित्र सकारात्मक दिसत असले तरी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील वंजारी समाजाची परिस्थिती बिकट आहे. शैक्षणिक, समाजिक सुविधांपासून समाज वंचित आहे. ही आरक्षणाची मागणी करताना कृती समिती आगामी 10दिवस महाराष्ट्रात दौरा करणार आहे. त्यानंतर नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्र मेळावा होणार आहे. या मेळाव्यात आंदोलनाची दिशा ठरेल. हे आरक्षण कोणा एका समाजाला दूखवून मागणी केले जात नाही, असे धात्रक म्हणाले.

कोंडाजी आव्हाड यांनी आरक्षण 2 टक्क्यांवरून 5 टक्के करण्याची मागणी करताना म्हटले की, वंजारी समाज 80 टक्के शेतीवर अवलंबून आहे. समाजातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांचे प्रमाण मोठे आहे. वंजारी समाजात 7 ते 8 टक्के आहे. आणि आरक्षण 2 टक्केच मिळते. त्यामुळे वाढीव आरक्षण देताना ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी,ही काळाची गरज आहे. वंजारी समाज आरक्षणाची मागणी करताना इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणातून हिस्सा मागत नाही तर वेगळे वाढीव आरक्षण देऊन समाजातील वंचितांना शासनाने विकासाच्या प्रवाहात आणावा, असे आव्हाड म्हणाले. यावेळी वंजारी समाजातील पदाधिकार्‍यांनी मनोगत व्यक्त केले.

कृती समितीच्या मागण्या

शासनाने जातीनिहाय जनगणना करावी, त्याचबरोबर वंजारी समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात वाढीव आरक्षण मिळावे, उद्योग-व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, तसेच समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना जिल्हास्तरावर शासकीय वसतीगृहाची उभारणा शासनाने करावी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -