घरमुंबईअखेर! अंगणवाडी सेविकांचं मानधन वाढलं

अखेर! अंगणवाडी सेविकांचं मानधन वाढलं

Subscribe

मागील वर्षांपासून अंगणवाडी सेवकांनी वाढीव मानधनासाठी खूप लढा दिला. शासनाच्या निर्णयामुळे त्यांच्या लढ्याला अखेर यश आले. 

अंगणवाडी सेविकांनी आपल्या मानधन वाढीसाठी केलेल्या आंदोलनाला अखेर यश आलं आहे. केंद्र सरकारने ऑक्टोबर २०१८ रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ केल्याचं जाहीर केलं होतं. पण, केंद्र सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आतापर्यंत राज्य सरकारकडून ही मानधन वाढ जारी करण्यात आली नव्हती. पण, आता महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारच्या निर्णयानुसार राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनातही वाढ करण्याचा अखेर निर्णय घेतला आहे. मागील वर्षांपासून अंगणवाडी सेवकांनी वाढीव मानधनासाठी खूप लढा दिला. शासनाच्या निर्णयामुळे त्यांच्या लढ्याला अखेर यश आले.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश

अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेत राज्य सरकारकडून लवकरच अंमलबजावणी केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सप्टेंबर २०१८ मध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ केल्याची घोषणा केली. पण, राज्य सरकारकडून यावर ठोस निर्णय घेतला जात नव्हता. केंद्र सरकारच्या निर्णयानुसार मानधनात वाढ व्हावी यासाठी अंगणवाडी सेविकांनी अनेकदा संप केले, जेलभरो आंदोलन केलं, असहकार आंदोलन पुकारलं. अखेर या आंदोलनाला यश मिळालं आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याबाबतचा जीआर सरकारने काढला आहे. १ ऑक्टोबर २०१८ पासून मानधन वाढ करण्यास सरकारने मंजूरी दिली होती.

- Advertisement -

हेही वाचा – एफडीएकडून सांगली, कोल्हापूर पूरग्रस्तांना मदत

दोन लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना लाभ

अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांच्या मानधनासाठी केंद्र सरकारकडून ६० टक्के आणि राज्य सरकारकडून ४० टक्के याप्रमाणे निधी दरवर्षी केंद्र शासनानच्या निकषानुसार मंजूर करण्यात येतो. ‘एकात्मिक बाल विकास सेवा योजने’ची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यात ५५३ प्रकल्पाअंतर्गत ९७ हजार ४७५ अंगणवाडी सेविका, ९७ हजार ४७५ मदतनीस आणि १३ हजार ०११ मिनी अंगणवाडी सेविका असे एकूण २ लाख ०७ हजार ९६१ कर्मचारी कार्यरत आहेत. इतक्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

मानधनासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी अनेक आंदोलनं केली. अखेर या आंदोलनाला यश मिळालं आहे. केंद्र सरकारने लागू केलेली मानधनवाढ महाराष्ट्र सरकारने लागू केली आहे. १ ऑक्टोबर २०१८ पासून मानधनवाढ लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे, केंद्र सरकारच्या निर्णयानुसार १ ऑक्टोबर २०१८ पासूनचे वाढीव मानधन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
राजेश सिंह, सचिव, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ

सरकारच्या निर्णयानुसार

                                      केंद्राने लागू केलेली मानधनवाढ      राज्याने यापूर्वी केलेली वाढ       एकूण मानधन

अंगणवाडी सेविका (SSC पास)            ४५००                                ३५००                        ८०००

- Advertisement -

मदतनीस                                        २२५०                                 २०००                       ४२५०

मिनी अंगणवाडी सेविका                      ३५००                                 २२५०                       ५७५०

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -