घरताज्या घडामोडी‘बॉईज टाऊन’मध्ये साडेसात टक्के शुल्कवाढ

‘बॉईज टाऊन’मध्ये साडेसात टक्के शुल्कवाढ

Subscribe

नाराजी : पाचवीचा विनाअनुदानित वर्ग सुरु करण्यास पालकांचा विरोध

पी. एन. मेहता एज्युकेशनल ट्रस्ट नाशिक संस्था संचलित बॉईज टाऊन इंग्लिश हायस्कूलच्या पाचवीच्या वर्ग विनाअनुदानित करण्यास पालकांनी विरोध केला आहे. स्कूलमध्ये मंगळवारी (दि.३०) आयोजित बैठकीत पालकांनी पाचवीचा वर्ग अनुदानितच ठेवण्याची मागणी करत वार्षिक साडेसात टक्के शैक्षणिक शुल्कवाढीवर नाराजी व्यक्त केली. तर ट्रस्टी रतन लथ यांनी शाळा चालविणे परवडत नसल्याने पाचवीचा वर्ग विनाअनुदानित सुरु केला जाणार आहे. शुल्क वाढ ‘पीटीए’च्या नियमानुसार करण्यात आली आहे, असे पालक योगेश पगार यांनी सांगितले.

माजी ट्रस्टींना बॉईज टाऊन स्कूल अनुदानित चालविणे कसे परवडत होते, असा सवाल बैठकीत पालकांनी उपस्थित केला. त्यावर लथ यांनी स्वत: पगार घेत नसल्याचे सांगितले. इंग्रजी माध्यमाची अनुदानित शाळाची असल्याने मुलांचे प्रवेश घेतले आहेत. पालकांनी २० ते २५ हजार रुपये शुल्क भरले आहेत. शाळेची जागा भविष्यात बिल्डरांच्या ताब्यात द्यायची आहे. त्यासाठी जागा ट्रस्टकडून भाडेतत्वावर दिली जाणार आहे. पालकांना शाळा प्रशासनाकडून बोलू दिले जात नाही. शिक्षण विभागाकडे दिलेल्या फाईलमध्ये शाळेच्या जागेत दुसरी शाळा दाखविली आहे. प्रत्यक्षात शाळेच्या जागा विनाअनुदानित शाळा दाखवली आहे. अनुदानित शाळेस विद्यार्थी मिळत नसल्याने दाखवत विनाअनुदानित शाळा सुरु करण्याचा घाट घातला जात आहे. शासनाच्या नियमांकडे दुर्लक्ष केले जात आहे, त्यामुळे पालकांची नाराजी कायम आहे. इंग्रजी माध्यमाची शाळा मालेगावात चालविणे परवडत आहे मग नाशिकमध्ये का परवडत नाही, असे पालक योगेश पगार यांनी सांगितले.

- Advertisement -

पाचवीच्या वार्षिक शुल्कामध्ये वार्षिक २ हजार ७०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गतवर्षी शुल्क ३६ हजार रुपये होते. यंदा ३८ हजार रुपये शुल्क आहे. मासिक शुल्कवाढ केल्याचा काही पालकांचा गैरसमज झाला होता. त्यांचा गैरसमज दूर केला आहे. पाचवीचा वर्ग विनाअनुदानित असेल.

-रतन लथ , पी. एन. मेहता एज्युकेशन ट्रस्ट बॉईज टाऊन पब्लिक स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय

- Advertisement -

बॉईज टाऊन स्कूल अनुदानित असून, ती अनुदानितच राहिली पाहिजे. बैठकीतही पालकांनी बॉईज टाऊन स्कूल अनुदानित ठेवण्याची मागणी केली. मात्र, बॉईज टाऊन स्कूल प्रशासनाकडून पाचवीचा वर्ग चालू शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून विनाअनुदानितच असतील, असे सांगण्यात आले. शुल्क वाढ करताना पालक शिक्षक संघाचा पैसा किती आहे, याची माहिती देण्यात आली नाही. याविरोधात पालकांची एकजूट केली जाईल.
– योगेश पगार, पालक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -