घरमहाराष्ट्रनाशिकभाई आलेत, पार्टीसाठी पैसे द्या!

भाई आलेत, पार्टीसाठी पैसे द्या!

Subscribe

नाशिकरोडच्या सिन्नरफाटा भागात टोळक्याचा धुडगूस, दुकानाची तोडफोड करत दुकानदाराकडून साडेबाराशे रुपये हिसकावले. संघटीत गुन्हेगारीअंतर्गत कारवाई करण्याची स्थानिकांचे पोलिसांना साकडे

भाई आलेत, पार्टीसाठी पैसे द्या, अशा शब्दांत दमबाजी करत नाशिकरोडच्या सिन्नरफाटा येथील एका दुकानाची तोडफोड करत एका टोळक्याने दुकानमालकाकडील पैशांची लूट केल्याची घटना घडली. गेल्या आठवडाभरापासून नाशिकरोड भागात सुरू असलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. दरम्यान, लुटारूंवर संघटीत गुन्हेगारी अंतर्गत कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी पोलिसांकडे केली.

नाशिकरोड येथील सिन्नरफाटा येथील अनंत प्रोव्हीजन स्टोअर्स या दुकानात शुक्रवार, ३१ जानेवारीला रात्री १० वाजेच्या सुमारास जबरदस्तीने घुसखोरी करत एका टोळक्याने दुकान मालक अजित बेदमुथा यांच्यासह तेथे उपस्थित लोकांना मारहाण केली. तसेच, दुकानातील वस्तूंची नासधुस करत दुकान जाळण्याचीही धमकी दिली. एवढ्यावर न थांबता या टोळीतील एकाने बेदमुथा यांच्या खिशातील साडेबाराशे रुपये हिसकावून घेतले. या घटनेने घाबरलेल्या बेदमुथा यांनी तातडीने नाशिकरोड पोलिसांना या घटनेची माहिती देत तशी तक्रार केली. या भागातील मयुर वाघमारे, पवन भोळे, तेजस कडवे व सौरव निकम आणि अन्य दोघांनी धुमाकूळ घालत लुटमार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

- Advertisement -

सर्वपक्षीयांचे निवेदन, पोलिसांची डोळेझाक

स्टेशनवाडी, विष्णुनगर, साठेनगर, नाशिकरोड येथील रहिवाशांसह सर्वपक्षीय व्यक्तींनी या घटनेचा निषेध करत नाशिकरोड पोलिसांना निवेदन दिले. गेल्या काही महिन्यांपासून संघटीत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पोलिस स्टेशनला वेळोवेळी निवेदन व तक्रारी देऊनही या टोळ्यांची दहशत कमी होत नाही. या टोळ्यांमध्ये अनेक रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, कारवाई झाली तरीही जामीनावर सुटका झाल्यानंतर त्यांचा उपद्रव पुन्हा सुरू होतो. त्यामुळे पोलिसांनी थेट संघटीत गुन्हेगारीअंतर्गत कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे नागरिकांनी केली. या निवेदनाच्या निमित्ताने गुन्हेगारांकडे नाशिकरोड पोलिसांची होणारी डोळेझाकदेखील अधोरेखित झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -