घरमनोरंजन‘रिलेशनशिप’ थीम वर रंगणार महाराष्ट्राची हास्य जत्रा

‘रिलेशनशिप’ थीम वर रंगणार महाराष्ट्राची हास्य जत्रा

Subscribe

या हास्यजत्रेत सामील व्हायचं असेल, तर सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ कार्यक्रमाच्या पुढच्या एपिसोडची वाट पाहावी लागणार आहे.

‘रिलेशनशिप’ हा असा शब्द आहे जो आजकाल अगदी सहज उच्चारला जातो. नात्याचे महत्त्व ठाऊक असल्यामुळे प्रत्येकचजण नात्यासोबत येणारी जबाबदारी पूर्ण करण्याचाही मनापासून प्रयत्न करत असतो.  प्रेम, विश्वास, समंजसपणा यांच्यासह काही गमती-जमती देखील नात्याचा एक हिस्सा असतात. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आणि त्यातील कलाकार हे कोणताही प्रसंग विनोदी बनवण्यासाठी अगदी मशहूर आहेत. येत्या आठवड्यात नात्यांवरही काही विनोदी किस्से दाखवून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची पुढील थीम ‘रिलेशनशिप’ वर आधारित असून ‘जावई-सासू’, ‘वडील-मुलगी-प्रिंसिपल’, ‘पॅड्या-पशा’ यांच्यामध्ये असलेले नाते आणि त्यांच्या नात्यातील गमतीशीर किस्से सोमवारी आणि मंगळवारी रंगणार आहेत.

- Advertisement -

या थीममध्ये लांबचा चुलता गेला म्हणून पॅड्याच्या भेटीला आलेला पशा, खरं तर नातेवाईक काय बोलतील म्हणून पॅड्याच्या दुखात सामील व्हायला आलेला पशा आणि त्यानंतर थेट बोंबीलवरुन होणारी चर्चा, जावई आणि सासू यांच्यामध्ये ‘ऍडल्ट सिनेमा’वरुन होणारा विनोदी वाद,मुलगी-वडील-मुख्याध्यापक यांचे संभाषण असे विनोदी स्किट्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. कलाकार पॅडी कांबळे, प्रसाद खांडेकर,पृथ्वीक, शीतल, समीर चौघुले यांनी भन्नाट परफॉर्मन्स देऊन जज महेश कोठारे यांनाही भरपूर हसवलंय. तुम्हालाही या हास्यजत्रेत सामील व्हायचं असेल, तर सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ हा कार्यक्रम पाहावा लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -