घरमहाराष्ट्रनाशिककोणाला विमान तर कोणाला कपबशी निशाणी; बाजार समितीच्या प्रचाराला आला वेग

कोणाला विमान तर कोणाला कपबशी निशाणी; बाजार समितीच्या प्रचाराला आला वेग

Subscribe

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी १८ जागांकरिता होत असलेल्या निवडणुकीत तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित १५ जागांसाठी ३७ उमेदवार रिंगणात असुन यामध्ये दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे. माजी सभापती देविदास पिंगळे यांच्या ’आपलं पॅनल’ व माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्या ’शेतकरी विकास पॅनल’ पॅनलमध्ये ही लढत रंगणार आहे. शुक्रवार (दि २१) रोजी उमेदवारांना चिन्ह वाटप करून अंतिम उमेदवारी यादी प्रसिद्ध करण्यात आली. यात पिंगळे गटाला कपबशी तर चुंभळे गटाला विमान हे चिन्ह मिळाले आहे.

देविदास पिंगळे व त्यांचे लहान बंधू गोकुळ पिंगळे हे दोघेही एकाच गटातून निवडणूक रिंगणात आहेत. तर चुंभळे यांचेही कडवे आव्हान राहणार आहे. त्यामुळे या गटाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. सहकारी संस्थेचा मतदारसंघाच्या एकूण ११ पैकी सर्वसाधारण सात जागांसाठी १८ उमेदवार, महिला राखीव दोन जागांसाठी चार, इतर मागास वर्गीय एका जागेसाठी दोन, विमुक्त जाती विमुक्त जमाती एका जागेसाठी दोन, उमेदवार रिंगणात आहेत.

- Advertisement -

ग्रामपंचायत मतदार संघ चार जागांपैकी सर्वसाधारण दोन जागांसाठी सहा, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती एका जागेसाठी दोन, आर्थिक दुर्बल घटक एका जागेसाठी दोन असे एकूण ३७ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये माजी सभापती देविदास पिंगळे यांच्या ’आपलं पॅनल’ व माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्या ’शेतकरी विकास पॅनल’मध्ये सरळ लढत होत आहे. सहकारी संस्था मतदार संघ सर्वसाधारण गटाच्या सात जागांसाठी १८ उमेदवार रिंगणात आहेत. यात माजी सभापती देविदास पिंगळे व त्यांचे बंधू गोकुळ पिंगळे हे सर्वसाधारण या एकाच गटातून आपले नशीब आजमावत आहेत. आपलं पॅनलकडून देविदास पिंगळे, संपतराव सकाळे, तुकाराम पेखळे, उत्तम आहेर, युवराज कोठुळे, उत्तम खांडबहाले, बहिरू मुळाणे रिंगणात आहेत. तर शेतकरी विकास पॅनलकडून शिवाजी चुंभळे, तानाजी करंजकर, गणेश चव्हाण, राजाराम धनवटे, नामदेव बुरंगे, प्रभाकर माळोदे, शिवाजी मेढे निवडणूक लढवत आहेत.

सहकारी संस्था मतदारसंघातील इतर मागासवर्ग प्रवर्गाच्या एका जागेसाठी आपलं पॅनलचे दिलीप थेटे व शेतकरी विकास पॅनलचे धनाजी पाटील यांच्यात सरळ लढत होणार आहे. सहकारी संस्था मतदार संघातील विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गाच्या एका जागेसाठी शेतकरी विकास पॅनलचे प्रल्हाद काकड व आपलं पॅनलचे विश्वास नागरे समोरासमोर आहेत.
सहकारी संस्था मतदारसंघातील महिलांसाठी राखीव असलेल्या दोन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात असून समोरासमोर लढत होणार आहे. यामध्ये आपलं पॅनलच्या विजया कांडेकर, सविता तुंगार तर शेतकरी विकास पॅनलच्या कल्पना चुंभळे व शोभा माळवे यांच्यात लढत होणार आहे. ग्रामपंचायत संस्था मतदारसंघातील सर्वसाधारण गटाच्या दोन जागांसाठी सहा उमेदवार रिंगणात आहेत. आपलं पॅनलचे जगन्नाथ कटाळे व विनायक माळेकर, शेतकरी विकास पॅनलचे तानाजी गायकर व प्रकाश भोये, अपक्ष सोमनाथ जाधव व राजाराम धात्रक यांच्यात लढत होणार आहे.

- Advertisement -
१ जागेसाठी सरळ लढत

ग्रामपंचायत संस्था मतदारसंघाच्या आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेल्या एका जागेसाठी सरळ लढत होणार असून आपलं पॅनलच्या निर्मला कड व शेतकरी विकास पॅनलचे सदानंद नवले यांच्यात लढत होणार आहे. यामध्ये आपलं पॅनलचे भास्कर गावीत, शेतकरी विकास पॅनलच्या यमुना जाधव व अपक्ष अलका झोंबाड यांच्यात लढत होईल. यात अपक्ष उमेदवार गोकुळ पिंगळे (तलवार), अनिल ढिकले (छत्री), पोपट पेखळे (तुळशीवृंदावन), दिनकर साळवे (खुर्ची), सोमनाथ जाधव (तुळशीवृंदावन), राजाराम धात्रक (हातोडी) तर अलका झोंबाड (बॅट) या निवडणूक चिन्हावर लढणार आहे.

शिंदे गटाचे ढिकले अपक्ष

माविआ आणि शिवसेना भाजप युती अशी रंगत बाजार समितीत बघायला मिळणार होती. परंतु अखेरच्या क्षणापर्यंत युतीचे नेते कुठेही चुंभळे सोबत दिसले नाही. शिंदे गटाचे अनिल ढिकले हे चुंबळेंच्या गटातून उमेदवारी करणार असल्याची चर्चा असली तरी त्यांना मात्र छत्री या निशाणीवर निवडणूक लढवावी लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -