घरमहाराष्ट्रनाशिकबागलाणमध्ये मक्यावर लष्करी अळीचे संकट

बागलाणमध्ये मक्यावर लष्करी अळीचे संकट

Subscribe

मक्याचे थोडेफार हाती येणारे पीकदेखील झाले नष्ट

पावसाने सर्वदूर हाहाकार माजला असताना, कसमादे भागातील काही तालुके मात्र अद्याप दमदार पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. पावसाने पाठ फिरवल्याने सटाणा तालुक्यातील जायखेडा भागात अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या वाया गेल्या असताना आता लष्करी अळीमुळे मक्याचे थोडेफार हाती येणारे पीकदेखील नष्ट झाले आहे. त्यामुळे थेट मक्याच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

बाजरीला पर्याय आणि कमी खर्चाचे नगदी व बोनस पीक म्हणून शेतकऱ्यांकडून खरिपात मक्याला पसंती दिली जाते. यंदा मात्र लष्करी अळीने शेतकऱ्यांची चांगलीच दमछाक झाली असून, आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. मक्याकडे कल वाढल्याने बाजरीचे क्षेत्र घटले आहे. घरापुरती बाजरी करून अनेक शेतकरी मक्याला पसंती देतात. मक्याला उत्पादन खर्चही कमी लागत असल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या दृष्टीने सर्वात सोपे पीक म्हणून मक्याकडे पाहिले जाते. मात्र लष्करी अळीने आक्रमण केल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. या अळीवर नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना महागड्या औषधांची फवारणी करावी लागत आहे. लष्करी अळीने एक दोन नव्हे तर बागलाण तालुक्यातील सर्वच क्षेत्रावर आक्रमण केले असल्याने अळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकऱ्यांमध्येच चढाओढ लागली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -