घरमहा @२८८जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघ - म. क्र. १५८

जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १५८

Subscribe

जोगेश्वरी पूर्व (विधानसभा क्र. १५८) हा मुंबई उपनगरातल्या उत्तर पश्चिम या लोकसभा मतदारसंघातला विधानसभा मतदारसंघ आहे.

जोगेश्वरी पूर्व या विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी शिवसेनेच्या पाठिशी आपली ताकद नेहमीच उभी केली आहे. २०१४ आणि त्याआधीच्या २०१९च्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचे रवींद्र वायकर या मतदारसंघातून विधानसभेवर गेले होते. विशेष म्हणजे याचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या उत्तर-पश्चिम मुंबईतून २००९पर्यंत काँग्रेसचंच वर्चस्व होतं. मूलभूत नागरी समस्या हा इथला नेहमीच कळीचा मुद्दा राहिला आहे. या मतदारसंघात एकूण २६४ मतदान केंद्र आहेत.

मतदारसंघ क्रमांक – १५८

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला


मतदारांची संख्या

पुरुष – १,५७,८११
महिला – १,३१,९९४

- Advertisement -

एकूण मतदार – २,८९,८०५


rAVINDRA wAIKAR
रवींद्र वायकर

विद्यमान आमदार – रवींद्र वाईकर, शिवसेना

कट्टर शिवसैनिक म्हणून रवींद्र वायकर यांनी आजपर्यंत पक्षाच्या अनेक योजना आणि आंदोलनांमध्ये सहभाग घेतला किंवा नेतृत्व केलं. मुंबई महानगर पालिकेमध्ये ते ४ वेळा नगरसेवक तर ४ वेळा स्थायी समितीचे अध्यक्ष राहिले आहेत. २००९साली पहिल्यांदा ते विधानसभेवर निवडून गेले. काँग्रेसच्या भाई जगताप यांचा त्यांनी सुमारे १४ हजार मतांनी पराभव केला होता. २०१६मध्ये काँग्रेसचे तत्कालीन मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांनी रवींद्र वायकरांवर आरे कॉलनीमध्ये २० एकर जमीन लाटल्याचा आरोप केला होता.


विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) रवींद्र वाईकर, शिवसेना – ७२,७६७
२) उज्वला मोडक, भाजप – ४३,८०५
३) राजेश शर्मा, काँग्रेस – २६,६१७
४) भालचंद्र अंबुरे, मनसे – ११,८७४
५) दिनकर तिवडे, राष्ट्रवादी काँग्रेस – २३६३

नोटा – २०३८

मतदानाची टक्केवारी – ५५.६४ %


हेही वाचा – उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -