घरताज्या घडामोडीST Workers Strike: नाशिकमध्ये शिवशाही बसवर दगडफेक

ST Workers Strike: नाशिकमध्ये शिवशाही बसवर दगडफेक

Subscribe

महामार्ग बसस्थानकात उभ्या शिवशाहीच्या काचा फुटल्या, पुणे, धुळ्यासाठी दोन शिवशाही रवाना

वेतनासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी सुरू केलेला संप आज सलग चौथ्या दिवशीही सुरूच होता. प्रवाशांचे हाल बघता आज नाशिकमधून पोलीस बंदोबस्तात पुणे आणि धुळे शहरासाठी दोन शिवशाही बसेस रवाना करण्यात आल्या. दरम्यान, महामार्ग बसस्थानक परिसरात उभ्या असलेल्या एका बसवर काही व्यक्तींनी दगडफेक केल्याने तिच्या काचा फुटल्या.

प्रवाशांची फरफट, आर्थिक शोषण आणि गैरसोय लक्षात घेता प्रशासनाने पोलिसांच्या सहकार्याने नाशिकमधून दररोज १० शिवशाही बसेस पाठवण्याचं नियोजन केलंय. या नियोजनामुळे प्रवाशांचा मनस्ताप काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मध्यवर्ती बसस्थानकातून गुरुवारी दुपारनंतर धुळे आणि पुणे शहरासाठी दोन शिवशाही रवाना करण्यात आल्या. दुसरीकडे मोटरसायकलवरुन आलेल्या दोघा अज्ञात व्यक्तींनी थेट महामार्ग बसस्थानकात जाऊन उभ्या असलेल्या शिवशाहीच्या काचा फोडल्या. त्यामुळे वातावरण तणावग्रस्त बनलंय.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांचं आवाहन, कोर्टाचे निर्देश आणि पोलिसांकडून मध्यस्थीचे प्रयत्न निष्फळ ठरल्यानं एसटी कर्मचार्‍यांचा संप चिघळण्याची शक्यता आहे. एसटीचे कर्मचारी मागण्यांवर ठाम असल्यानं एसटी बसेसवर अवलंबून हजारो प्रवाशांचे प्रचंड हाल सुरू आहेत. राष्ट्रीय आणि राज्य मार्गांवर खासगी प्रवाशी वाहतुकीचा पर्याय उपलब्ध असला तरीही आदिवासी आणि दुर्गम भागातल्या प्रवाशांची मात्र फरफट सुरूच आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -