घरताज्या घडामोडीChildren's Day 2021: बालदिनानिमित्त नवी मुंबईतील मुले साकारणार चित्रांतून स्वच्छतेच्या नाविन्यपूर्ण संकल्पना

Children’s Day 2021: बालदिनानिमित्त नवी मुंबईतील मुले साकारणार चित्रांतून स्वच्छतेच्या नाविन्यपूर्ण संकल्पना

Subscribe

स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशातील स्वच्छ शहरांत असलेले तृतीय क्रमांकाचे मानांकन उंचाविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सर्व नागरिकांच्या सहयोगाने सजगतेने काम करीत आहे. यामध्ये महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विदयार्थ्यांच्या मनातील स्वच्छतेविषयीच्या जाणीवा चित्रांच्या माध्यमातून अभिव्यक्त व्हाव्यात तसेच त्यांच्या अंगभूत कलागुणांना प्रोत्साहन मिळावे यादृष्टीने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली बालदिनाचे औचित्य साधून रविवारी १४ नोव्हेंबरला ‘स्वच्छ चित्रकला स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे.

‘निश्चय केला – नंबर पहिला’ हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून स्वच्छतेकडे पुढचे पाऊल टाकले जात असताना निसर्ग उदयान, से.१४, कोपरखैरणे येथे सकाळी ७:३० या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत आठवी ते दहावीचे विद्यार्थी विनाशूल्क प्रवेश घेऊ शकतात. या स्पर्धेदरम्यान कोविड नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

- Advertisement -

‘हे’ आहेत चित्रकलेचे विषय

या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी – (१) माझे शहर – माझा सहभाग, (२) प्लास्टिकमुक्त माझे शहर किंवा (३) स्वच्छतेचा बालमहोत्सव यापैकी एका विषयावर दोन तासाच्या कालावधीत चित्र काढावयाचे आहे. चित्र काढण्यासाठी विद्यार्थ्यांना स्पर्धास्थळी महानगरपालिकेच्या वतीने कागद दिले जाणार असून त्याच कागदावर चित्र काढावयाचे आहे. चित्र काढण्याकरिता आवश्यक रंग तसेच पॅड व इतर पूरक साहित्य मुलांनी सोबत आणावयाचे आहे.

स्पर्धेतील सर्वेोत्कृष्ट चित्रांना पारितोषिकाने गौरविण्यात येणार असून पहिल्या तीन क्रमाकांना अनुक्रमे रु.११ हजार, ७ हजार, ५ हजार याप्रमाणे रक्कम व शिक्षणोपयोगी साहित्य स्वरूपात पारितोषिके दिली जाणार आहेत. तसेच निवडक १० चित्रकृतींना प्रत्येकी रु. १ हजार रक्कमेची उत्तेजनार्थ पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत. स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्रे प्रदान केली जाणार आहेत. या पुरस्कार व स्मृतीचिन्हांचे वितरण स्वतंत्ररित्या समारंभपूर्वक केले जाणार आहे. स्पर्धेविषयाच्या अधिक माहितीसाठी ९८६७९२२४१५ किंवा ९३२१५२५२८८ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावयाचा आहे.

- Advertisement -

 


हे ही वाचा – ST Workers Strike: नाशिकमध्ये शिवशाही बसवर दगडफेक


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -