घर महाराष्ट्र नाशिक "रोप वे थांबवा, जटायू वाचवा" अंजेनेरी ब्रम्हगिरी रोप-वे विरोधात न्यायालयात धाव घेण्याचा...

“रोप वे थांबवा, जटायू वाचवा” अंजेनेरी ब्रम्हगिरी रोप-वे विरोधात न्यायालयात धाव घेण्याचा इरादा

Subscribe

नाशिक : अंजनेरी-ब्रह्मगिरी असा तयार करण्याचे प्रस्तावित असून या कामाची निविदा प्रक्रियाही खुली करण्यात आली आहे. त्यामुळे रोप वे तयार करण्याच्या कामाच्या हालचालींना वेग आला आहे. मात्र पर्यावरणप्रेमींनी या विरोधात आवाज उठवला असून केवळ कुणाच्या तरी स्वपनपुर्तीसाठी गिधाडांचे अधिवास धोक्यात आणण्याचा हा प्रयत्न आहे. मुळात हा परिसर इको सेन्सिटीव्ह झोनमध्ये येत असून ब्रम्हगिरी हेरिटेज घोषित करण्याबाबतही याचिका न्यायालयात विचाराधीन आहे. त्यामुळे सदरची जागा ही रोप वे साठी देण्यात येऊ नये अन्यथा न्यायालयात धाव घेण्याचा इशारा अंजनेरी-ब्रह्मगिरी बचाव कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदनाव्दारे देण्यात आला.

यावेळी समिती पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची भेट घेत चर्चा केली. तसेच निवेदनही सादर केले. गिधाडाचे घर म्हणून अंजनेरी-ब्रह्मगिरीची पर्वतरांग ओळखली जाते. या ठिकाणी गिधाडांचे प्रजनन होते, मात्र सद्यस्थितीत गिधाडांची संख्या कमालीची घटली असून अशातच रोपवेचा घाट घातला जात आहे. त्यामुळे गिधाड प्रजातीवर संकट येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.गिधाडांच्या अधिवासास रोपवेच्या तारांच्या धोक्याबाबत वनविभागाच्या अहवालाचा अभ्यास करणे गरजेचे आहे.

- Advertisement -

ब्रह्मगिरी मेटघर किल्ल्याचा केंद्र सरकारच्या संवेदनशील क्षेत्रात समावेश असून स्थानिक प्रशासन व ग्रामस्थानीं याबाबतचे क्षेत्र निश्चिती प्रक्रिया पार पाडून अहवाल राज्य शासनाकडे पाठविला आहे. मेटघर किल्ला सामाईक वनहक्क प्राप्त,मेटघर पेसा ग्रामसभा असून या ग्रामसभेने रोप वे विरोधात ठराव केलेला असूनही या ग्रामसभा ठरावाची कुठलीही दखल न घेता, ग्रामसभेस बैठकीस न बोलावता रोपवेसाठी जमीन देणे आदिवासी बांधवांच्या हक्कांचे उल्लंघन ठरणार आहे. शासन नियुक्त गडदुर्ग समित्यांनीही येथील रोपवे विरुद्ध ठराव केलेला असतांना त्यांना डावलून रोपवेच्या ठेकेदारांच्या हितासाठी घाईघाईत हि बैठक आयोजीत करून रोपवेसाठी जागा देण्याची प्रक्रिया सुरु करणे अंजनेरीची समृद्ध जैवविविधता व ब्रह्मगिरीची पवित्रता संपविण्याचा घाट घातला जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मात्र प्रशासनाने ही जागा रोप वे देण्याचा निर्णय घेतला तर प्रसंगी याविरोधात न्यायालयात धाव घेण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -