घरमहाराष्ट्रनाशिकजिल्हयातील विद्यार्थ्यांना आता शाळांमध्येच मिळणार दाखले; 'आपल सरकार' केंद्राना शाळा करणार कनेक्ट

जिल्हयातील विद्यार्थ्यांना आता शाळांमध्येच मिळणार दाखले; ‘आपल सरकार’ केंद्राना शाळा करणार कनेक्ट

Subscribe

नाशिक : महाविद्यालयीन प्रवेश कालावधीत विविध प्रकारचे शैक्षणिक दाखले काढण्यासाठी होणारी विद्यार्थ्यांची गर्दी लक्षात घेता आता शाळांमधूनच दाखले देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. याकरीता विविध तालुक्यांमध्ये विशेष मोहिम हाती घेण्यात येणार असून शाळांची यादी तयार करून नजीकच्या आपलं सरकार केंद्रातून हे दाखले वितरीत करण्यात येणार आहे. त्यामुळे ऐनवेळी दाखल्यांसाठी होणारी गर्दी टाळता येईल असे पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.

दहावी,बारावी झालेल्या विद्यार्थ्यांना पुढच्या शिक्षणासाठी नॉन क्रिमीलेअर, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखल, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र यासाठी आपलं सरकार केंद्रात गर्दी करावी लागते. दिवसभर वाया घालवूनही अनेकदा त्यांचे काम होत नाही. केंद्र चालविणार्‍यांकडून विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होते. हे होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांमध्येच आवश्यक दाखल्यांसाठी आवश्यक कागदपत्रे मागवून शाळेतच त्यांना दाखले देण्यात येणार आहे. आपलं सरकार केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची अक्षरशः आर्थिक लुटमार सुरू असल्याच्या तक्रारी आहेेत. विविध दाखल्यांसाठी अक्षरशः रेट कार्डच तयार करण्यात आले आहे.

- Advertisement -

मात्र प्रवेश रदद होउ नये म्हणून अडलेले विद्यार्थी, पालक अतिरिक्त पैसे देण्यासही राजी होतात. शैक्षणिक दाखले हे प्रत्येक कामासाठी आवश्यक असलेले दस्त आहे. त्यामुळे इयत्ता दहावीतच विद्यार्थ्यांना शाळांमध्येच ते उपलब्ध करून दिल्यास दरवर्षी प्रवेश कालावधीत दाखले मिळविण्यात येणार्‍या अडचणींना विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागणार नाही. याकरीता पालकमंत्री दादा भुसे यांनी प्रशासनाला प्रत्येक तालुक्यात शाळांमध्ये दाखले देण्यासाठी मोहिम राबविण्याचे आदेश दिले. आता प्रत्येक गावात महा ई सेवा केंद्र सुरू झालेले आहेत. प्रत्येक शाळेच्या नजीक असलेल्या महा ई सेवा केंद्राच्या माध्यमातून शासकीय शुल्क आकारून हे दाखले उपलब्ध करून देण्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यानूसार प्रशासनाकडून याकरीता विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून तरी विद्यार्थ्यांची होणारी लुटमार थांबेल आणि वेळेत दाखले मिळतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -