घरमहाराष्ट्रनाशिकविद्यार्थ्यांनी जाणून घेतली पोलिसांची कार्यपद्धती

विद्यार्थ्यांनी जाणून घेतली पोलिसांची कार्यपद्धती

Subscribe

सातपूर : विद्यार्थ्यांच्या मनात पोलीस प्रशासनाबाबत असलेली कुतूहल, भिती, गैरसमज दूर व्हावे, त्यांना पोलिसांच्या कार्यपद्धतीची माहिती मिळावी, यासाठी सेंट विन्सेंट स्कूल तसेच मॉडर्न इंग्लिश स्कूल, अशोक नगर येथील विद्यार्थ्यांनी सातपूर पोलीस ठाण्यात भेट देत कामकाजासह शस्त्रांची माहिती घेतली.

पोलीस हवालदार जगताप यांनी विद्यार्थ्याना पोलिसांच्या शस्त्रांसह ती वापरण्याबाबत माहिती दिली. मुलांनी विविध विभागास भेट देत पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीची माहिती घेतली. तक्रार कशी करावी, शस्त्रे, लॉकअप, सायबर क्राइम यासोबतच एक जागरुक नागरिक म्हणून कोणती काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. संशयित वस्तूला हात लावू नये, गुन्हा घडल्यावर एका जागरुक नागरिकाप्रमाणे पोलिसांचे कान आणि डोळे बनून अशा घडनांबाबत पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी केले. सर्व पोलीस कर्मचार्‍यांनी विद्यार्थ्याचें स्वागत करत मुलांच्या विविध बालसुलभ प्रश्नांबाबत शंकांचे निरसन करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -