घरमहाराष्ट्रनाशिकउत्तराखंडच्या नागरिकांकडूनही नाशिकच्या शेतीचा अभ्यास

उत्तराखंडच्या नागरिकांकडूनही नाशिकच्या शेतीचा अभ्यास

Subscribe

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन; महाराष्ट्र चेंबर्सचा सुवर्ण महोत्सव

नाशिक : नाशिक हा कृषीप्रधान जिल्हा आहे. निसर्गसौंदर्याने नटलेल्या या जिल्ह्यात कांदा, द्राक्ष पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. वाईन कॅपिटल म्हणून नाशिकने आपली नवी ओळख निर्माण केली आहे. नाशिकच्या प्रगतीशील शेतीविकासाचा अभ्यास करण्यासाठी उत्तराखंडहून लोक येतात, असे गौरवोद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काढले. देश विकासाच्या एका नव्या वाटेवरून जात आहे. समाजातील सर्वच घटकांनी विकासाच्या या प्रक्रियेत सहभागी व्हायला हवे, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँण्ड अ‍ॅग्रीकल्चर सुवर्ण महोत्सवी वर्षाच्यानिमित्ताने कालिदास कलामंदिर येथे आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री छगन भुजबळ, खासदार हेमंत गोडसे, खासदार उन्मेश पाटील उपस्थित होते. यावेळी राज्यपाल कोश्यारी म्हणाले, नाशिकचा देवभूमी, यंत्रभुमी म्हणून विकास होताना आर्थिक विकासाचा संकल्प यानिमित्ताने प्रत्येकाने करायला हवा, असे मत त्यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

चा अमृतमहोत्सव असा दुग्धशर्करा योग जुळून आला आहे. नाशिक हे कृषी, पर्यटन क्षेत्रात अग्रेसर आहे. मी ज्या-ज्या वेळी नाशिकमध्ये येतो तेव्हा नाशिकच्या सुंदर वातावरणाची भूरळ मला पडते. नासिक म्हणजे नाक नाशिक हे देशाचं नाक आहे. समुद्रमंथनातून निघालेल्या अमृतकुंभाचे थेंब सर्वप्रथम नाशिकच्या भुमीत पडले अशी ही पावन भुमी असून विकासातही पुढे घेउन जाण्यासाठी उद्योजकांनी प्रयत्न करावेत. महाराष्ट्र चेंबरने आपल्या संघटनेत कृषीचाही सामावेश केला आहे. नाशिकमध्ये द्राक्षं, कांदा पिकाचं उत्पादन मोठया प्रमाणावर घेतले जाते.

नशिकने कृषी क्षेत्रात प्रगती केली असून याचा अभ्यास करण्यासाठी उत्तराखंडहून लोक येतात ही गौरवास्पद बाब असल्यचे त्यांनी सांगितले. एकिकडे विकसित नाशिक अन् दुसरीकडे पिण्याच्या पाण्याच्या समस्या आहेत. देशाच्या विकासाचे स्वप्न जेव्हा पाहतो तेव्हा सर्वसामावेशक विकास व्हायला हवा. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. दिवस बदलतात भुजबळांसारखे नेतृत्व जिल्ह्याला लाभले, त्यामुळे या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त संकल्प घेऊन पुढे घेऊन जायला हवे तरच सर्वसमावेशक विकास शक्य असल्याचे ते म्हणाले.

- Advertisement -

प्रास्ताविकात अध्यक्ष ललित गांधी यांनी चेंबर्सच्या वाटचालीविषयी माहिती दिली. उत्तर महाराष्ट्राच्या विकासात योगदान देणार्‍या कंपनी प्रतिनिधींचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार डॉ. राहुल आहेर, देवयानी फरांदे, चेंबर्सचे वरिष्ठ उमेश दाशरथी, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, संजय सोनवणे, नाशिक शाखेच्या अध्यक्षा सुनीता फाल्गुणे, उमेश वानखेडे, विजय बेदमुथा उपस्थित होते.

उत्तर महाराष्ट्र विकासापासून उपेक्षित : भुजबळ

देशाच्या औद्योगिक विकासात महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राज्य राहिले आहे. राज्याच्या औद्योगिक विकासात नाशिकचे योगदान अनन्य साधारण आहे. या औद्योगिक विकासासोबतच पर्यावरण संतुलनाच्या दिशेने ठोस पावले उचलण्याची गरज असून प्रदूषण विरहित नाशिकचा औद्योगिक विकास होण्यासाठी संकल्प करणे गरजेचे आहे, असे मत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. नाशिकमध्ये पायाभूत सुविधांचा विकास झाला आहे. मुंबई पुण्याला जे जे होईल, ते सर्व नाशिकलाही व्हावे असे सांगतानाच पश्चिम महाराष्ट्राचा जेवढा विकास झाला, त्या तुलनेत उत्तर महाराष्ट्र विकासापासून उपेक्षित राहिल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. मासीआ अर्थात महाराष्ट्र चेंबर्स काँमर्स इंडस्ट्रीने आजपयर्र्ंत औद्योगिक क्षेत्रातील मसीहा म्हणून काम केल्याचे सांगत त्यांनी चेेंबर्सच्या कार्याचा गौरव केला.

महिलांना स्थान द्या

राज्यपाल म्हणाले, महाराष्ट्र आणि उत्तराखंडमधील लोक सारखे आहेत. मेहनती आहेत. उत्तराखंडमधील लोक मजुरी करू शकतात. महाराष्ट्रातील लोक शेती करतात. द्राक्ष, कांदे पिकवतात. मुली शिक्षणात पुढे आहेत. मी ज्या ज्यावेळी विद्यापीठांच्या पदवीदान समारंभात जातो तेव्हा पदक विजेत्यांमध्ये मुलींचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. पण चेंबर्सच्या कार्यक्रमात महिला दिसत नाहीत. महिलांना उद्योगात स्थान द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कृषीपूरक उद्योगांची पायाभरणी करावी : थोरात

नाशिकमध्ये द्राक्षे, कांदा, उस, सोयाबीन, डाळिंब अशी पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. याचाच उपयोग करून स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी नाशिककरांना मोठी संधी आहे. या संधीचा उपयोग करून महाराष्ट्र चेंबरने कृषीपूरक उद्योगांची पायाभरणी केल्यास नाशिक देशात अग्रेसर ठरेल असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. उद्योग व्यवसाय चालना देण्यासाठी शासनस्तरावर आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल असेही ते म्हणाले.

 

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -