घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र'त्या' व्हिडीओमुळे दादा भुसे अडचणीत येणार ?

‘त्या’ व्हिडीओमुळे दादा भुसे अडचणीत येणार ?

Subscribe

नाशिक : राष्ट्रवादीचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांनी बंदरे आणि खणीकर्म मंत्री तसेच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांचा एक व्हिडिओ ट्विट केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमध्ये दादा भुसे दोन तरुणांना मारहाण आणि शिवीगाळ करताना दिसत आहेत. अब्दुल सत्तार पासून ते उदय सामंत यांच्यापर्यंत अनेक मंत्री अडचणीत सापडलेले असताना आता दादा भुसे यांच्याही अडचणी या व्हिडीओ मुळे वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दादा भुसे हे आक्रमक आणि डॅशिंग म्हणून ओळखले जातात. परंतु, मंत्रिपदावर असताना काही आचारसंहिता पाळायला हव्यात, कोणालाही मारहाण किंवा शिवीगाळ करणे कितपत योग्य असा सवाल विरोधक उपस्थित करत आहेत. आ. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांना सवाल केले आहेत. ‘मंत्री दादा भुसे फटकवतात, शिव्या देतात, मुख्यमंत्री साहेब, कुठला गुन्हा पोलीस घेणार, पोलिसांसमोर मारले” असा सवाल आव्हाड यांनी केला आहे.

- Advertisement -

आ. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओमुळे हिवाळी अधिवेशनात विरोधात दादा भुसे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न करू शकतील. गायरान जमिनीच्या मुद्द्यावरून कृषीमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. त्यातच आता दादा भुसे यांच्या या व्हिडिओ मुळे त्यांच्याही अडचणीत वाढ होऊ शकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -