घरमहाराष्ट्रनाशिकअठराव्या वर्षी दोन पुस्तकांचे लिखाण

अठराव्या वर्षी दोन पुस्तकांचे लिखाण

Subscribe

दोन पुस्तकांचं लिखाण, फोटोग्राफीवरील ५० हून अधिक लेख, टॅटू आर्टिस्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करतानाही पुस्तकांशी झालेली मैत्री... हे तसं अजब समिकरण म्हणावं लागेल...

दोन पुस्तकांचं लिखाण, फोटोग्राफीवरील ५० हून अधिक लेख, टॅटू आर्टिस्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करतानाही पुस्तकांशी झालेली मैत्री… हे तसं अजब समिकरण म्हणावं लागेल… ज्या वयात तरुणाई करिअर निवडीच्या द्विधा मनस्थितीत असते, त्या वयात नाशिकच्या शरयू श्याम पवार हिने स्वतःच्या छंदातून करिअरच्या विविध वाटा तयार केल्या. तिची ही वाट कुणालाही प्रेरणादायी ठरावी, अशीच आहे.

मोबाईल आणि लॅपटॉपच्या डिजिटल आभासी जगात रमणारी तरुणाई चौकटीपलिकडे जाऊन विचारांची क्षमता तरुणाई हरवून बसल्याची टिका होत असतानाच, वास्तव मात्र वेगळंच असल्याचं शरयूने स्वतःच्या कामगिरीतून दाखवलंय. सध्या एचपीटी कॉलेजात एसवायबीएच्या वर्गात शिकत असलेल्या शरयूला वाचनाचं सर्वाधिक वेड. विचारमंथनातून पुढे मनातले अंकुर अलगद कागदांवर उमटू लागले. हीच आपली आवड असल्याचे लक्षात आल्यावर शरयू लिहिती झाली. दोन वर्षांपूर्वी ’इंक फोबिया’ आणि ’नाइट रायडर’ ही तिची दोन पुस्तके अ‍ॅमेझॉन आणि किंडलवर प्रकाशित झाली. इंक फोबिया हे पुस्तक टॅटूची मानसिक भीती या विषयावर आधारीत आहे, तर नाइट राडयर हे पुस्तक एका व्यक्तीने कॅन्सरवर केलेली मात या विषयाला वाहिलेले आहे. या पुस्तकांना जगभरातील वाचकांचा चांगला प्रतिसाद लाभलाय.

- Advertisement -

वाचन, लिखाण यासोबतच शरयू प्रोफेशनर टॅटू आर्टिस्ट आहे. ब्रायडल मेकअपही करते. याशिवाय ’युवर कोट्स’ या साईटवर शरयूचे अनेक वास्तवादी आणि प्रेरणादायी असे कोट्स आहेत. काही मॅगझिन्ससाठी लिखाणाचं कामही ती करते. विशेष म्हणजे फोटोग्राफी विषयावरील तिचे ५० हून अधिक लेख आजवर प्रकाशित झाले असून, पुढील काळात १ हजार लेख लिहिण्याचा तिचा मानस आहे. तिच्या या कामगिरीची दखल घेत विविध संस्थांनी तिचा पुरस्काराने सन्मानही केला आहे.

लिखाण हीच पॅशन

शरयूमध्ये विविध कलांचा संगम दिसत असला तरीही, लिखाण हीच माझी पॅशन आहे, असं ती सांगते. लॅपटॉप किंवा मोबाईलवर काम करताना या अबोल यंत्रांची सवय मात्र शरयूने जडू दिलेली नाही. म्हणूनच इतर कलांसाठीही ती आवर्जुन वेळ काढते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -