घरमनोरंजनतगडी स्टार कास्ट असलेल्या ‘कलंक’चं पहिलं पोस्टर लाँच

तगडी स्टार कास्ट असलेल्या ‘कलंक’चं पहिलं पोस्टर लाँच

Subscribe

‘कलंक’मध्ये वरुण धवन जफरच्या भूमिकेत आहे. अत्यंत निर्भय आणि नेहमीच संकटाशी दोन हात करायला तयार असणारा जफर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

‘कलंक’ चित्रपटाचे पाहिलं पोस्टर आल्यापासून प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण करताना दिसत आहे. ‘कलंक’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा वरूण धवनचा पहिला लूक दिग्दर्शक करण जोहरने गुरुवारी सोशल मीडियावर शेअर केला. यासोबतच अभिनेत्री आलिया भट्ट, वरूण धवन, माधुरी दीक्षित, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा अशी तगडी स्टार कास्ट असलेल्या ‘कलंक’चं पहिलं पोस्टर लाँच करण्यात आलं आहे. या सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या पोस्टरमध्ये वरूनचा जफर म्हणून पहिला लूक वरुनच्या चाहत्यांसाठी सादर केला. अभिषेक वर्मन यांनी दिग्दर्शित केलेला हा वरूण धवनचा आतापर्यंत आलेल्या चित्रपटांपेक्षा सर्वात मोठा आशावादी चित्रपट असल्याने प्रेक्षकांना नक्कीच उत्सुकता असणार आहे की, ३१ वर्षाचा असलेला अभिनेता या चित्रपटात कशी भूमिका साकारतोय.

- Advertisement -

वरुण धवन जफरच्या भूमिकेत

‘कलंक’ या चित्रपटातील त्याच्या भूमिकेविषयी आणि त्याच्या वेगळ्या लूक विषयी त्याच्या चाहत्यांनी लक्ष वेधून घेतले आहे. वरुणने देखील त्याचा हा लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. ७ मार्चला सोशल मीडियावर हे पोस्टर शेअर केल्यानंतर काही क्षणात हे व्हायरल झालं आणि # ‘कलंक’ने ट्विटर आणि फेसबुकवर ट्रेन्डिंग सुरू झाल्याचे दिसले. ‘कलंक’मध्ये वरुण धवन जफरच्या भूमिकेत आहे. अत्यंत निर्भय आणि नेहमीच संकटाशी दोन हात करायला तयार असणारा जफर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. करणनं एक दिवस आधी ‘कलंक’मधला एक फोटो शेअर केला होता. या चित्रपटाचं स्वप्न आपण जवळपास १५ वर्षांपूर्वी पाहिल्याचं त्यानं म्हटलं.

वडिलांचं स्वप्न सत्यात 

या चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर येत असताना वरूणने त्याच्यासाठी हा चित्रपट असा आहे, ज्यावर मी सर्वस्व झोकून काम केलं आहे. हा चित्रपट माझ्या वडिलांचं स्वप्न होतं. असं स्वप्न ज्यावर त्यांनी या जगाचा निरोप घेण्यापूर्वी काम केलं आहे. हे स्वप्न मी तेव्हा पूर्ण करु शकलो नाही. पण, त्या स्वप्नाला एक दिशा मात्र नक्की मिळाली आहे….’ असे लिहीत त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या.

- Advertisement -

या चित्रपटामुळे चाहत्यांमध्ये वाढ

हम्पी शर्मा की दुल्हनिया (२०१४), दिलवाले (२०१५), जुडावा २ (२०१७) बदलापूर (२०१५), बद्रीनाथ की दुल्हनिया (२०१७) आणि ऑक्टोबर (२०१८) या चित्रपटातील त्याच्या अभिनयामुळे वरूणच्या चाहत्यांमध्ये वाढ होऊन त्याने अनेक पुरस्कार देखील मिळविले.

१९४० च्या दशकातील कथानक

वरुणची सहकलाकार आलिया भट्ट हिने देखील ट्विट केले आणि सांगितले, “प्रेमात न घाबरणारा, प्रेमात प्रेमासाठी काहीही करणारा. जफरचा हा लूक सगळ्यांसमोर आणताना आनंद होत आहे. ‘कलंक’मध्ये अनेक मोठे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. १९४० च्या दशकातील कथानक या चित्रपटात पाहायला मिळत आहे.

निर्माता दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कलंक’ चित्रपटातील सर्वच कलाकारांचा लूक कसा असेल हे आता समोर येत आहे. वरुण धवन आणि आदित्य राय कपूरच्या लुक नंतर आता संजय दत्तचा लुक समोर आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -