घरमहाराष्ट्रनाशिकझेडपी शिक्षकांच्या बदलीला अखेर मुहूर्त लागला; 'अशी' होणार बदली

झेडपी शिक्षकांच्या बदलीला अखेर मुहूर्त लागला; ‘अशी’ होणार बदली

Subscribe

नाशिक : जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची बदली प्रक्रिया सुरु झाली असून, जिल्ह्यातील साधारणत: 3 हजार शिक्षकांची बदली होण्याची शक्यता वर्तवली जाते. बदली प्रक्रियेत यंदा विविध टप्पे केल्यामुळे प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी डिसेंबर उजाडणार आहे.

नाशिक जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 3 हजार 263 शाळा आहेत. त्यातील दोन लाख 65 हजार 895 विद्यार्थ्यांना सुमारे 11 हजार शिक्षक शिकवतात. मागील काही वर्षांपासून शिक्षक भरती झालेली नाही. तसेच दरवर्षी सेवानिवृत्त होणारे शिक्षक आणि कोरोनाकाळात काही शिक्षकांचा दुर्देवी मृत्यू झाला. यामुळे शिक्षण विभागात रिक्त जागांचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे. याचा विचार करुन आदिवासी व बिगर आदिवासी तालुक्यांमधील शिक्षकांची बदली प्रक्रिया राबवली जात आहे.

- Advertisement -

सद्यस्थितीला बदली पात्र शिक्षकांनी ऑनलाईन सादर केलेल्या माहितीनुसार शिक्षणाधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगईन आयडीवरुन रिक्त जागांची माहिती सादर करण्याची प्रक्रिया सुरु आहे. 4 नोव्हेंबर 2022 पर्यंत ही प्रक्रिया सुरु राहिल. त्यानंतर बदली प्रक्रियेतील पहिल्या टप्प्यात समाविष्ट होणारे दिव्यांग शिक्षक, विकलांग आदी शिक्षकांनी केलेल्या अर्जाच्या आधारे त्यांना बदलीचे ठिकाण दिले जाईल. त्यांची संपूर्ण यादी जाहीर झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरु होणार असल्यामुळे एकाच वेळी शेकडो शिक्षकांची बदली यावेळी होणार नाही. टप्प्याटप्प्याने ही प्रक्रिया पुढे सरकणार असल्याने त्या प्रत्येक टप्प्यावर येणार्‍या हरकती प्राथमिक शिक्षणाधिकारी हे निकाली काढणार आहेत.

जिल्हा परिषद शिक्षकांची बदली प्रक्रिया सुरु झाली आहे. प्रत्येक टप्प्यावर शिक्षकांना बदली प्रक्रियेत सहभागी करुन घेतले जाणार असल्याने अत्यंत पारदर्शी पध्दतीने ही प्रक्रिया पार पडेल. : भास्कर कनोज, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जि.प.नाशिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -